किडनी हा शरीरातील खूप महत्वपूर्ण अवयव असून आपल्या शरीरातील विषारी घटक आणि द्रव्य बाहेर काढण्याचे काम किडनीच्या माध्यमातून होते. परंतु जर काही कारणास्तव किडनीमध्ये समस्या निर्माण झाली शरीराला नुकसानकारक ठरू शकणारे घटक बाहेर निघणे शक्य होत नाही व ही समस्या पूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे असून हलगर्जीपणा जीवावर सुद्धा बेतू शकतो.
किडनी खराब होण्यामागे बऱ्याचशा प्रकारच्या आपल्या सवयी देखील कारणीभूत आहे. त्यामुळे किडनीच्या निरामय आरोग्यासाठी काही सवयी आजच सोडणे खूप गरजेचे आहे व त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:Health Tips: 'या' 4 पालेभाज्या रोजच्या आहारात खा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
किडनीच्या आरोग्यासाठी या सवयी आजच सोडा
1- शुगरचे जास्त सेवन करणे टाळा- बऱ्याच जणांना जेवणामध्ये गोड पदार्थ खाण्याची सवय असते किंवा जेवण झाल्यानंतर स्वीट आवर्जून खाल्ले जाते.
परंतु जास्त प्रमाणात असे शुगर असलेले पदार्थांचे सेवन केले तर किडनीला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अशा गोड पदार्थांच्या सेवनाने मधुमेहाचा देखील धोका संभवतो. त्यामुळे गोड पदार्थांचे सेवन करणे टाळणे उत्तम राहते.
2- उशिरा झोपणे किंवा पुरेशी झोप न घेण्याची सवय टाळा- आता आपल्याला माहित आहेच की, चांगल्या आरोग्यासाठी कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक क्रिया देखील व्यवस्थित राहतात व शरीराचा फिटनेस टिकून राहतो.
परंतु तुम्ही सहा किंवा सात तासापेक्षा कमी वेळ झोप घेत असाल तर शरीरातील इतर अवयव आणि किडनीला अनेक वाईट परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे अनेक प्रकारचे आजार देखील उद्भवू शकतात.
नक्की वाचा:Health Tips: पायावरचे 'हे' संकेत असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे, वाचा महत्वपूर्ण माहिती
3- दिवसभरात पाणी कमी पिण्याची सवय- व्यवस्थित आरोग्यासाठी एका दिवसातून पाच ते सात लिटर पाणी पिण्याची गरज असते व यामुळे किडनीचे काम देखील उत्तम प्रकारे चालते.
तुम्ही दिवसभरात जर रोज कमी पाणी पीत असाल तर तुमची किडनी हळूहळू गंभीरतेकडे वाटचाल करते. कारण किडनी जे काही शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
4- वेदनाशामक औषधांचे जास्त सेवन करणे टाळा- बऱ्याच जणांना शरीरात काही दुखत असेल किंवा थोडेफार आजारी पडल्यावर वेदनाशमक औषधे अर्थात पेन किलर घेण्याची सवय असते.
अशा पेन किलर चे सेवन जर तुम्ही जास्त करत असाल तर ते धोकादायक ठरू शकते. औषधांमध्ये सोडीयम असते व ते साफ करण्यासाठी किडनीला फार ताकत लावावी लागते. तुम्ही अशी औषध सेवन करत असाल तर त्यातील सॉल्ट साफ करण्यात किडनी फेल होण्याचा देखिल धोका असतो. त्यामुळे जास्त प्रमाणात पेनकिलरचे सेवन करणे टाळावे.
नक्की वाचा:दुधासोबत करा या पदार्थाचे सेवन, वजन होईल झटपट कमी, वाचा सविस्तर
Published on: 06 October 2022, 04:17 IST