Health

आवळा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानला जातो. आयुर्वेदात ही आवळ्याला महत्वाचं स्थान आहे.

Updated on 03 May, 2022 1:09 PM IST

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पॉलिफेनॉल, लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि जस्त यांसारखे पोषक घटक आढळतात. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तसेच त्वचा, डोळे आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु काही बऱ्याच वेळा आपण तो चुकीच्या वेळी सेवन केला तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणून खालील पैकी आपल्याला काही समस्या असेल तर आपण आवळ्याचे सेवन प्रमाणात किंवा न केलेलं बरे.

यकृताची समस्या

                यकृताच्या रुग्णांनी आवळ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करावे. 

आवळ्याचे सेवन पूर्णपणे टाळावे. जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने यकृतातील एन्झाईम्सची पातळी वाढू शकते, जे यकृताच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे.

 कमी रक्तदाब

         ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी आवळ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. ते खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. अशा परिस्थितीत रुग्णाची समस्या वाढू शकते.

 कमी साखर

         ज्या लोकांमध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यासाठी आवळा जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. आवळा खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते, त्यामुळे हायपोग्लाइसेमियाचा धोका वाढू शकतो.

किडनी रुग्ण

           ज्या लोकांना किडनीशी संबंधित कोणतीही समस्या आहे. त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करावे. आवळ्याच्या अतिसेवनाने शरीरातील सोडियमची पातळी वाढते, तसेच किडनीच्या कार्यावरही परिणाम होतो.

सर्दी आणि खोकला

           जर तुम्हाला सर्दी आणि फ्लूची समस्या असेल तर तुम्ही या दरम्यान आवळा खाणे टाळावे. आवळा थंड आहे, अशा परिस्थितीत तो तुमची समस्या आणखी वाढवू शकतो.

त्वचा आणि टाळू

            जर तुम्हाला त्वचा आणि टाळूच्या कोरडेपणाची समस्या असेल तर आवळ्याचे जास्त सेवन केल्याने ही समस्या वाढू शकते. याशिवाय आवळ्यामध्ये असे काही घटक असतात, ज्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आवळा खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्या.

 

 Nutritionist & Dietitian Naturopathist

 Dr. Amit Bhorkar

 whats app: 7218332218

English Summary: If you have these six problems, don't take it by mistake.
Published on: 03 May 2022, 01:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)