Health

खजूर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बहुतांश लोकांना खजूर खायला आवडते. खजूर खायला चविष्ट आणि मधुर आहे तेवढेच आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वपूर्ण आणि लाभदायी आहे. खजुराचे सेवन दररोज केल्याने शरीराला अविश्वसनीय असे महत्त्वाचे फायदे होतात व आरोग्य छान राहते. त्या लेखामध्ये आपण खजूर खाल्यामुळे काय फायदे होतात याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 02 October, 2022 3:05 PM IST

खजूर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बहुतांश लोकांना खजूर खायला आवडते. खजूर खायला चविष्ट आणि मधुर आहे तेवढेच आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वपूर्ण आणि लाभदायी आहे. खजुराचे सेवन दररोज केल्याने शरीराला अविश्वसनीय असे महत्त्वाचे फायदे होतात व आरोग्य छान राहते. त्या लेखामध्ये आपण खजूर खाल्यामुळे काय फायदे होतात याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Health Tips: दुधासोबत तुम्ही घेतले 'हे' पदार्थ तर मिळतात अपेक्षेपेक्षा जास्त फायदे, वाचा डिटेल्स

 खजूर खाण्याचे फायदे

1- हृदयासाठी फायद्याचे- खजूर मध्ये फायबरचे प्रमाण असते.हे फायबर हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. एवढेच नाही तर खजूरमध्ये असलेला पोटॅशियम हा घटक हृदयविकाराचा जो काही धोका आहे तो कमी करण्यास मदत करतो.

2- रक्तदाब नियंत्रणासाठी- खजूरमध्ये असलेले मॅग्नेशियम हा घटकामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते व पोटॅशियम हा घटक उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

3- ॲनिमीयासाठी गुणकारी- ऍनिमिया हा आजार लाल रक्तपेशी आणि आयर्नच्या कमतरतेमुळे होतो. खजुराचे सेवन केल्यामुळे यामध्ये असलेले लोह हे अशक्तपणा आणि आयर्नची कमतरता दूर करण्यात मदत करते.

4- रातांधळेपणावर फायदेशीर- बऱ्याच व्यक्‍तींना रातांधळेपणाची समस्या असते. अशा व्यक्तीने जर खजुराची पेस्ट बनवून डोळ्याभोवती लावली तर त्याचा फायदा मिळतो.

नक्की वाचा:Health Tips: अविश्वसनीय आहेत शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, वाचा डिटेल्स

5-कॅव्हिटीपासून मिळतो आराम- खजूरमध्ये एक विशिष्ट प्रकारचे रसायन असते व ते दातांवरील प्लॅक काढून टाकते व त्यामुळे कॅव्हिटी तयार होऊ देत नाही.

6- त्वचा केसांच्या आरोग्यासाठी- विटामिन सी समृद्ध असलेले खजूर त्वचेचा मुलायमपणा टिकवून ठेवते व खजूर मध्ये असलेले विटामिन बी 5 केसांना देखील निरोगी बनविते.

7- नर्व्हस सिस्टिमसाठी- खजूर मध्ये साधारणतः सगळ्या प्रकारचे जीवनसत्व असल्यामुळे ते नर्वस सिस्टमसाठी खूप महत्वपूर्ण आहे. खजूरमध्ये असलेल्या पोट्याशियम या घटकामुळे मेंदूला सतर्क आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

नक्की वाचा:Health Tips: तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी 'या' फळांचे सेवन ठरेल खूप फायदेशीर, वाचा माहिती

English Summary: if you eat daily date that get so many health benifit and body keep fitness
Published on: 02 October 2022, 03:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)