Health

आपणही फ्लॉवरचे सेवन करत असणार, बरोबर ना! फ्लावर चे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, त्याच्यात असणारी पोषक तत्त्वे आपणास अनेक रोगापासून वाचवते. फ्लावर मध्ये असलेले विटामिन्स आणि इतर खनिजे आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. असे असले तरी, फ्लॉवरचे जास्त सेवन करणे आपल्या शरीरात अपायकारक ठरू शकते. याचे आपल्या शरीराला काही साईड इफेक्ट सुद्धा होतात ते आपलाच जाणून घेणे गरजेचे ठरते. म्हणूनच आज आपण फ्लॉवर पासून होणारे काही साईड इफेक्ट जाणून घेणार आहोत.

Updated on 22 December, 2021 10:22 PM IST

आहार तज्ञांच्या मते फ्लॉवरचे जास्त सेवन केल्याने आपल्या शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण हे कमालीचे वाढते. जर आपल्या शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण एका निश्चित पातळीपेक्षा जास्त वाढले तर यामुळे आपणास अर्थराइटिसचा त्रास होऊ शकतो. फ्लावर मध्ये कॅल्शियम चे प्रमाण हे देखील लक्षणीय असते कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी उपयोगाचे आहे पण जास्त प्रमाणात कॅल्शियम आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतो, यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील युरिक ऍसिड वाढू शकते. फ्लावर मध्ये पोटॅशियम देखील असतो आपल्या शरीरात पोटॅशियम जास्त प्रमाणात झाल्यास यामुळे रक्त हे घट्ट बनायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपणास अनेक रोगांना सामोरे जावे लागू शकते.

फ्लॉवरचे साईड इफेक्ट (Side Effect Of Cauliflower)

  • मानवी रक्तात यूरिक ॲसिड नामक केमिकल आढळते. जो शरीरातील युरिक नावाच्या प्रोटीनच्या तुटल्याने तयार होतो. फ्लावरमध्ये प्युरिनचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे जास्त प्रमाणात फ्लावर खाल्ल्याने संधिवात असलेल्या रुग्णांना इतर आजारांना देखील सामोरे जावे लागू शकते.
  • जर आपणास किडनी स्टोन अर्थात मुतखड्याचा त्रास असेल तर आपणास फ्लावरचे सेवन करण्यापासून दूर राहिले पाहिजे. याच्या सेवनाने किडनीमध्ये मुतखडा तयार होण्याची शक्यता वाढत जाते.
  • ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांनी तसेच ज्या व्यक्तींना गॅस चा प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीने फ्लावरची सेवन करू नये यामुळे ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांना गॅस चा प्रॉब्लेम होऊ शकतो तसेच ज्या व्यक्तींना आधीच गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यांची ही समस्या अधिकच वाढू शकते, त्यामुळे त्यांना इतरही आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे फ्लॉवरचे सेवन अशा व्यक्तींनी शक्यतो टाळावे.
  • Note: या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती, सल्ल्यासह, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ला किंवा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी किंवा असे अनुकरण करण्यापूर्वी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagaran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
English Summary: if you are eating more cauliflower then you will be suffer from this desease
Published on: 22 December 2021, 10:22 IST