सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात भेसळ (Counterfeiting) केली जात आहे, अन्नपदार्थात भेसळ (Food adulteration) आता काही जणू नेहमीचेच झाले आहे. रोजाना भेसळ संदर्भात एखादी बातमी वृत्तपत्रात झळकत असते, सणासुदीच्या काळात (During the festive season) तर भेसळीचे प्रमाण अजूनच वाढते.
येत्या काही दिवसात देशात होळीचा सण साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर भेसळीचे प्रमाण अजूनच वाढू शकते, आणि सहाजिकच सणासुदीच्या दिवसात आपल्या घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात आणि यासाठी दूध तसेच तुपाची गरज भासत असते. गावरान तुपाचे दाम तर दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत, आधी प्रत्येकाच्या घरात गावरान तूप (Gavaran Ghee) बनत असे मात्र आता काळाच्या ओघात या गोष्टी पण हवेत विरल्या आहेत, तर काहीजण बनवतात मात्र ते तूप थोडेच बनते त्यामुळे बाजारातून तूप आणावेच लागते, बाजारात सध्या तुपाला 600 ते 700 रुपये प्रतिकिलो एवढा भाव आहे. त्यामुळे आज आपण बाजारातून आणलेले अथवा गावागावातून फिरणाऱ्या फेरीवाल्यांकडून आणलेले तूप अर्थात गावरान तूप पूर्णता शुद्ध आहे की त्यात भेसळ आहे हे कसे शोधायचे याविषयी जाणून घेणार आहोत.
तूप ओरिजिनल का डुप्लिकेट
»मित्रांनो जर तुम्ही बाजारातून तूप आणले आणि तूप असली आहे का नकली म्हणजेच तुपात भेसळ आहे की काय? याबाबत जर शास्वत नसाल, तर आपण घरच्या घरी तुपाची शुद्धता तपासू शकता. यासाठी आपण आपल्या घरात असलेला तवा गॅस वरती गरम करण्यास ठेवा, त्यावर एक चमचा तूप टाका जर तव्यावर टाकलेल तूप लगेच विरघळल आणि रंगहीन झालं तर असच तूप शुद्ध म्हणून समजावं. परंतु तुपाला वीरघळण्यासाठी विलंब झाला आणि विरघळून देखील तुपाचा रंग पिवळाच राहिला तर असे तूप भेसळयुक्त असल्याचे समजावे.
»आपण, गावरान तूप आपल्या तळहातावर ठेवून देखील त्यात भेसळ आहे की नाही ते ओळखू शकता. यासाठी अर्धा चमचा तूप आपल्या तळहातावर घ्या, तळहातावर घेतल्याबरोबर तूप जर वितळायला सुरुवात झाली तर असे तूप शुद्ध असते, मात्र जर तूप वितळायला उशीर झाला तर तुपात भेसळ असू शकते, ही चाचणी केवळ उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात केली जाऊ शकते. हिवाळ्यात ही चाचणी करून देखील योग्य तो निष्कर्ष मिळणार नाही.
Published on: 04 March 2022, 10:46 IST