कलिंगड हे उन्हाळ्यात खाल्लं जाणारं सर्वाधिक प्रसिद्ध आणि आवडतं फळ आहे. तसं बघितलं तर सध्याच्या परिस्थिती कलिंगड हे प्रत्येक ऋतू मध्ये आढळून येतात परंतु, ते उन्हाळ्यात खाण्याची मजा वेगळीच असते. उन्हाळ्याचे आगमन होताच बाजारात या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसते.
चवीला गोड आणि आतून लाल असलेलं कलिंगड प्रत्येकालाच हवं असतं त्यासाठी आपण विक्रेत्याला ते योग्यरीत्या तपासण्यास सांगतो. मात्र, ती एक नैसर्गिक गोष्ट असते आतून गोड असणार किंवा आंबट हे आपणही नाही आणि विक्रेताही नाही सांगू शकत.
परंतु, काही पद्धती आहेत ज्याचा माध्यमातून कलिंगड गोड आहे किंवा नाही हे ओळखता येऊ शकते.
काय आहेत गोड कलिंगड निवडण्याच्या पद्धती ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
कलिंगडवरील सफेद-पिवळे डाग: कलिंगकडे बारकाईने बघितल्यास आपणास एक गोष्ट लक्ष्यात येईल ती म्हणजे त्यावरील डाग. सामान्यतः कलिंगडावर सफेद, पिवळे आणि केशरी डाग असतात.
खरं तर, जेव्हा कलिंगड जमिनीतून बाहेर काढले जातात तेव्हा ते शेतात एखाद्या जागेवर ठेवले जात असे त्याचेच हे डाग असतात. आता ते बाजारातून घेतांना पिवळे किंवा केशरी डाग असलेले कलिंगड घ्या जेणेकरून ते आतून लाल आणि चवीला गोड असणार.
कलिंगडावरील जाळ्या: कलिंगड घेतांना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावरील जाळ्या. मुख्य म्हणजे, कलिंगडावरील या जाळ्या हे दर्शवतात की मधमाश्यांना फळाला किती स्पर्श केले आहे. याचा अर्थ असा की ज्या कलिंगडावर अधिक जाळ्या ते कलिंगड चवीला गोड.
लांबडा असलेल्य कलिंगडामध्ये पाण्याचे अंश जास्त असतात मात्र, तो फारसा गोड नसतो. आणि ज्या कलिंगडाचा आकार गोल असतो. तो चवीला देखील गोड असतो. म्हणून कलिंगड निवडतांना गोल निवडा आणि जर त्यात पाण्याचे अंश जास्त हवे असणार तर लांबडा कलिंगड घ्या.
आकार आणि वजन: कलिंगडाचा आकार जास्त मोठाही नसावा आणि जास्त छोटाही नको. माध्यम आकार आणि माध्यम वजनाचे कलिंगड गोड असतात.
देठ- कलिंगड घेतांना एक शेवटची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे देठ. कलिंगडाचे देठ जर हिरवे असेल तर ते चुकूनही घेऊ नये कारण त्याचा अर्थ असा होतो की कलिंगड पूर्णपणे पिकले नाहीत. म्हणून सुकलेला देठ असलेले कलिंगड निवडावे जेणेकरून ते आतून लाल आणि चवीला गोड राहील.
पुढच्या वेळी कलिंगड घेतांना या गोष्टींकडे लक्ष्य द्या आणि आतून लाल तसेच चवीला गोड असणाऱ्या कलिंगडाचा लाभ घ्या.
Published on: 04 April 2022, 01:08 IST