Health

हिवाळ्यात शरीराला पाणी कमी हिवाळा मोसमात अनेकांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते.

Updated on 13 March, 2022 6:50 PM IST

हिवाळ्यात शरीराला पाणी कमी हिवाळा मोसमात अनेकांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता होताच त्याची लक्षणंही दिसू लागतात. पाहुया सविस्तर..

आपल्या आरोग्यासाठी नियमित व पुरेसे पाणी पिणे आवश्‍यक आहे. शरीरामध्ये साठ टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्वाचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थांचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्‍यक असते.

पाणी कमी पडल्यास ही लक्षणं दिसतात

सतत भूक लागणे – जेवण केल्यानंतरही तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर ते पाण्याच्या कमतरतेमुळे देखील असू शकते.

लघवी पिवळसर होणे – शरीरात पाण्याच्या कमतरतेचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवी पिवळसर होणे. .

श्वासाची दुर्गंधी – तोंडातून दुर्गंधी येत असेल तर ते शरीरात पाण्याच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. जर आपल्या तोंडात पुरेशा प्रमाणात लाळ असेल तर ते बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करते, परंतु कमी पाणी प्यायल्याने लाळेची निर्मिती देखील कमी होते. त्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.

उन्हाळ्यात प्रमाण जास्त ठेवावे. जेणेकरून पचनाचे विकार होणार नाहीत. शरीराला आवश्‍यक एवढ्या पाण्याचे सेवन न केल्यास काही व्यक्तींना डोकेदुखी, अर्धशिशी यांसारखे आजार उद्‌भवू शकतात. बध्दकोष्ठता सध्या सर्वसाधारणपणे आढळला जाणारा आजार आहे. 

जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास बध्दकोष्ठतेचा आजार दूर होऊ शकतो. मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजनदेखील कमी होण्यास मदत होते. पाण्यामुळे चयापचयाचे प्रमाण वाढते. त्वचा तजेलदार व तुकतुकीत दिसण्यासाठी पाण्याची मदत होते.

रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.  

रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात. 

ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडीटी (पित्त) अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. 

आपल्या आरोग्यासाठी नियमित व पुरेसे पाणी पिणे आवश्‍यक आहे. शरीरामध्ये साठ टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्वाचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थांचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्‍यक असते.

English Summary: How to need of water of our body identify this
Published on: 13 March 2022, 06:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)