मीठ जेवणातील मुख्य भाग आहे. शरीराला मिठाची गरज असते. महत्वाचे म्हणजे शरीरातील (body) द्रव पदार्थ व इलेक्ट्रोलाइड्स (Electrolytes) यांच्यातला समतोल कायम राहावा आणि रक्तदाब नियंत्रणात राहावा यासाठी सोडियम महत्वाची भूमिका निभावत असते.
आपल्या शरीराला सोडियमपैकी (Sodium) 90 टक्के वाटा नेहमीच्या वापरातील साध्या मीठातून मिळतो. वैज्ञानिक भाषेत या मिठाला सोडियम क्लोराइड म्हणतात. लोकांनी रोज पाच ग्रॅमहून कमी नमक खायला हवं. याचा अर्थ साधारणतः एक चमचाभरच मीठ आपल्या शरीराला गरजेचं असतं.
मीठ जास्त खाल्ले तर हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर आणि मेंदूतील रक्तप्रवाहाला बाधा पोचणं, त्यातून डोक्यातील एखादी रक्तवाहिनी फुटणं किंवा रक्ताच्या गाठी निर्माण होणे इत्यादी शरीराला वाईट परिणाम होत असतात.
शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन
समुद्री मिठाचे पाहिले तर समुद्री मीठ स्वाभाविकपणे समुद्रातील खाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन करून तयार केलं जातं. हे मीठ शुद्ध नसतं आणि त्यात जास्त प्रमाणात खनिज-लवण असते. शिवाय, त्यात बरंच आयोडिनसुद्धा असते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. माहितीनुसार समुद्री मिठामध्ये शुद्ध मिठाच्या तुलनेत 10 टक्के कमी सोडियम असते.
आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ
हिमालयातून काढल्या जाणाऱ्या गुलाबी मिठातसुद्धा सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि त्यात मॅग्नेशियम व पोटेशियम यांसारखी खनिजं असतात. सेल्टिक सॉल्ट किंवा राखाडी मिठामध्येसुद्धा सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि इतर खनिजं जास्त प्रमाणात असतात.
हे मीठ नैसर्गिक असतं, त्यात कोणताही बाहेरचा पदार्थ मिसळला जात नाही. जास्त मीठ खाण्याची सवय असणाऱ्या लोकांना हे मीठ दिलासादायक वाटू शकतं. हे मीठ खाल्ल्याने आपल्या आहारातील पोटेशियमचं प्रमाण वाढतं, त्यामुळे काही विशिष्ट आजार झाल्यावर हे मीठ फायदेशीर ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या
LIC ची खास योजना; 'या' योजनेतून महिलांना 4 लाख रुपयांची मिळणार आर्थिक मदत
शेतकऱ्यांनो कोरडवाहू क्षेत्रात लागवड 'अशा' पद्धतीने करा; पिके येतील जोमात
दिलासादायक! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा; 728 कोटी रुपयांहून कर्ज वाटप
Published on: 28 September 2022, 04:06 IST