Health

कुळीथास हुलगी असेही म्हणतात.याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्तीं साठी हे कडधान्य फायदेशीर आहे. सर्व खतांच्या कडधान्यांच्या तुलनेत कुळथां मध्ये सर्वात कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील तो त्याचे प्रमाण अधिक आहे

Updated on 23 February, 2022 4:51 PM IST

कुळीथास हुलगी असेही म्हणतात.याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही. खरंतर स्थूल व्यक्‍तींसाठी हे कडधान्य फायदेशीर आहे. सर्व खतांच्या कडधान्यांच्या तुलनेत कुळथां मध्ये सर्वात कमी चरबी आहे व त्याचबरोबर त्यातील तो त्याचे प्रमाण अधिक आहे

कुळीथ हे सामान्यत:घोड्याचे पालन करण्यासाठी आहार म्हणून वापरले जाते. पारंपारिक आयुर्वेदिक पाककृतीमध्ये कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणून वापरले जाते.कुळीथ चवीला गोड तुरट व उष्ण असतात व पचायला हलके असतात.

  • कुळीथाचे आरोग्यदायी फायदे
  • आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्तींसाठी पथ्यकारक मानले आहे.तसेच लघवीच्या विकारांवर कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्‍तींना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळांतीणीना कुळथाचा काढा दूध वाढवण्यासाठी दिला जायचा.
  • आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकारक सांगितलेले आहे. पण डोळ्यांवर थेट त्याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा.
  • कुळीथ हे वातग्र,कफग्र आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पत्तेकर आहे. सुजेवर ही त्याचा उपयोग होतो.
  • उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पित्त प्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.कुळथामध्ये कॅल्शियम प्रमाण चांगले आहे.परंतु यातील काही घटकांमुळे(oxalates)  यातील कॅल्शियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींना (calcium oxalates) असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये.
  • लोहाची कमतरता दूर करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. तसेच हिवाळी हंगामात शरीराचे तापमान राखण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते.
  • कुळीथाचे गरम कढणतापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे.
  • शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
  • कुळीथाचे गरम कढणकिंवा कुळीथा च्या पिठाचे उद्वर्तन ( उटणे )लावल्यानेही चरबी कमी होते.
  • अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळथाच्या पिठाचे उद्वर्तन ( उटणे )लावण्याने खूप चांगला उपयोग होतो.
  • मुतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मुतखड्या मध्ये होणारी पोटातील वेदना (रिनल कोलिक ) कमी करण्यासाठी वापरतात.
  • प्रक्रिया न केलेले कच्चे कुळीथ बियाण्यामध्ये असे गुण आहेत जे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करतात.
  • पोटात वात धरणे, पोट दुखण,फुगल्यासारखे वाटणे यावर कोळीथाचा चांगला उपयोग होतो. पोटातील जंतावर ही याचा उपयोग होतो.
  • त्वचेची आग पुरळ व फोड दूर करण्यासाठी कुळीथाची पावडर पाण्याबरोबर घेणे उपयुक्त ठरते.त्वचेचा रंग उजळण्यासाठी त्वचेवर कुळीथ बियाणे पेस्ट करून लावावे.
  • खोकला, सर्दी, कप यावर कुळीथाचा चा वापर करावा.
  • कुळीथ हे फेरुलिक, क्लोरो जे निक, कॅफेइक,व्हॅनिलआम्लं,जेनी स्टेअन आणि मालवीडीन वनस्पतीजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळिथ स्निग्ध पदार्थाचा अटकाव करतो आणि वजन कमी करण्यात याची मदत होते.
  • कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून पिल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवा सारखे उपयोगी आहे.मुतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते. सूज कमी होते.
  • अंगातील ताप कमी करते. सर्दी पडसे झाले असता छातीतील कफबाहेर काढण्यात कोळीथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते.
  • कुळीथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवूनअथ्रोस्किलरोसेस, हृदय विकाराचा झटका इत्यादी धोके टाळता येतात.
  • याकडधान्यातील तंतुमय पदार्थांमुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बुद्धकोष्टताटळते.कुलथा मधील शर्करात्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते.पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेही नाही उपयोगी आहे.
English Summary: horse gram is very benificial for good and strong health
Published on: 23 February 2022, 04:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)