रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे.आजच्या या कोरोना काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत सतर्क होण्याची गरज आहे. विशेषतः प्रत्येकाला आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्याची गरज आहे.अशा परिस्थितीत आपल्यासाठी मधाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. चला तर, जाणून घेऊया मधातील या औषधी फायद्यांविषयी अधिक माहिती...
मधापासून घरगुती उपचार :खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.वजन कमी करण्यासाठी देखील मध खूप उपयुक्त आहे. त्यात अजिबात चरबी नसते. याशिवाय मध कोलेस्टेरॉलची पातळी देखील नियंत्रित करतो. वजन कमी करण्यासाठी आपण कोमट पाण्यामध्ये मध मिसळून, ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता.
घसा खवखवणे या समस्येतून आराम देण्यासाठी देखील मध फार प्रभावी आहे. जर, तुम्हाला घसा खवखवणे किंवा घसा दुखण्याची असेल, तर मध सेवन केल्यास खूप आराम मिळेल.बद्धकोष्ठता हे बर्याच रोगांचे मूळ आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी मधाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. नियमित सेवन केल्यास पोटातील गॅस आणि अपचनापासूनही मोठा आराम मिळतो.मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. कोणत्याही ठिकाणी सूज किंवा वेदना असल्यास किंवा जखम झाली असल्यास थेट त्या जागी मध लावू शकता. यामुळे भरपूर आराम मिळेल.
Published on: 01 June 2022, 03:07 IST