Health

दूध हे आपल्या शरीरासाठी खूप पोषक आणि आवश्यक असते. दुधामध्ये व्हिटॅमिन, प्रोटिन्स, लोह, मिनरल तसेच इतर पोषक तत्वे असतात त्यामुळे दूध शरीरास उपयुक्त असते.बरेच लोक थंडीच्या दिवसांमध्ये दुधात गूळ टाकून पितात. याचे सुद्धा खूप फायदे।मानवी आरोग्यास आहे.

Updated on 22 November, 2021 4:08 PM IST

दूध हे आपल्या शरीरासाठी खूप पोषक आणि आवश्यक असते. दुधामध्ये व्हिटॅमिन, प्रोटिन्स, लोह, मिनरल तसेच इतर पोषक तत्वे असतात त्यामुळे दूध शरीरास उपयुक्त असते.बरेच लोक थंडीच्या दिवसांमध्ये दुधात गूळ टाकून पितात. याचे सुद्धा खूप फायदे।मानवी आरोग्यास आहे.

दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत.आरोग्यास पोषक असल्याने अनेक डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देत असतात.

1)वजन वाढत नाही:- जर का दुधामध्ये आपण साखरेऐवजी गूळ टाकून पिला तर आपले वजन वाढत नाही. आणि साखर टाकून पिला तर तुमच्या शरीरावर चरबीचे प्रमाण वाढेल त्यासाठी दुधामध्ये गूळ टाकून पिणे फायदेशीर आहे.

2)रोगप्रतिकारक शक्ती वाढते:- संध्याकाळी झोपताना तुम्ही दुधात गूळ मिसळून पिल्यामुळे तुमच्या शरीरात असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे दूध शरीरास आवश्यक आहे.

3)थकवा दूर होतो:- दुधात गूळ टाकून पिल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो आणि आराम मिळतो सोबतच हाडे मजबूत आणि तंदुरुस्त होतात.

4) पचनक्रिया व्यवस्थित राहते:- संध्याकाळी दुधात गूळ टाकून पिले तर पोटसंबंधीत असलेले सर्व आजार दूर होतात आणि पचनक्रिया एकदम सुरळीत चालते.

5) मासिक पाळीच्या काळात आराम:- मासिक पाळी च्या काळात महिलांनी दुधाचे सेवन केल्यास या वेळी होणार त्रास कमी प्रमाणात होतो.

6)हाडे मजबूत राहतात:- झोपण्यापूर्वी जर का आपण दुधात गुळ टाकून पिलो तर आपले शरीर नेहमी तंदुरुस्त राहते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.

English Summary: Here are the health benefits of drinking jaggery mixed with milk
Published on: 22 November 2021, 04:08 IST