सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. वातावरणातील तापमानात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून वाचणे फार महत्त्वाचेआहे. या लेखामध्ये आपण उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा याबद्दल माहिती घेऊ.
उष्माघाताविषयी माहिती आणि लक्षणे……
आपल्या शरीराचे तापमान हे साधारणपणे 98.6अंशाच्या जवळपास असते.शरीरातील सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी हे तापमान कायम ठेवणे आवश्यक असते.परंतु जास्त उन्हात राहिल्याने उष्माघात झाल्याने प्रखर तापमानामुळे शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची जी प्रक्रिया असते ती बिघडते व उष्माघाताची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारात व्यक्त होतात. उष्माघात झालेल्या रुग्णाला वेळीच उपचार न केल्यास रुग्ण दगावू शकतो.
उष्माघाताची लक्षणे
- पहिले लक्षण- हीट क्रॅम्पस-ऊन्हा मध्ये अति कष्टाचे काम करणाऱ्यांमध्ये हे लक्षण दिसून येते.या लक्षणांमध्येहात आणि पायामधील स्नायू आवळले जातात व दुखायला लागतात. हे शरीरातील सोडियम क्लोराइड चे प्रमाण कमी झाल्यामुळे होते.
- लक्षण दुसरे-हीट सिंकोप- बराच वेळ उन्हात जर उभे राहिलेत तर ब्लड प्रेशर कमी होण्याचा धोका संभवतोव जर का ब्लड प्रेशर कमी झाले तर रुग्णाला चक्कर येते.
- लक्षण तिसरे-हिट एकझोशन- उष्माघाताचा या लक्षणांमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण वाढते तसेच थकवा वाटणे व अंगात ताप भरतो अशी लक्षणे जाणवतात.पण या प्रकारात ताप 102 पेक्षा कमीच असतो.
- लक्षण चौथे- हिट स्ट्रोक-या प्रकारात तापमान 104 पेक्षा अधिक असते.हे सगळ्यात धोकादायक लक्षण असून यामध्ये वेळीच उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. यामध्ये मळमळ,उलट्या,डोकेदुखी,फिट येणे,त्वचा गरम व कोरडी पडणे,श्वासाची गती वाढणे,ब्लड प्रेशर कमी होणे इत्यादी लक्षणे दिसतात.
हिट स्ट्रोक झाल्यास उपाय योजना
1-सर्वप्रथम व्यक्तीला सावलीत व थंड ठिकाणी न्यावे.
2-शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावे.
3- शरीर ओले करावे व पंखा सुरू ठेवावा.
5-शक्य असल्यास काखेत, मानेत व पाठ तसेच मांड्यांमध्ये बर्फाची पिशवी ठेवावे.
उन्हापासून घ्यायची काळजी
- सकाळी अकरा ते चार या वेळात उन्हात काम करणे व फिरणे टाळावे.
- उन्हाळ्यामध्ये काम करताना सैल, फिक्या व सुती कपडे घाला.
- शक्य असल्यास टोपी,गॉगल,स्कार्फचा वापर करावा.
- तापमान वाढल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
- तहान लागण्याची वाट न बघता दररोज आठ ते दहाग्लास पाणी प्यावे.कैरीचे पन्हे,लिंबू सरबत,ताक,लस्सी इत्यादीप्यावे.
- आहारामध्ये कलिंगड,खरबूज,लिंबू, कांदा तसेच संत्र्याचा वापर करावा.
Published on: 10 March 2022, 01:37 IST