Health

गवती चहा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. गवती चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात शिवाय गवती चहा मध्ये असलेल्या अत्यावश्यक तेल हे सुगंधित आणि सौंदर्यप्रसाधने निर्मिती वापरले जाते. ऊर्धपातन पद्धत वापरून दोतीच्या मधील तेल वेगळे काढले जाते.

Updated on 23 March, 2021 12:05 PM IST

 गवती चहा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. गवती चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात शिवाय गवती चहा मध्ये असलेल्या अत्यावश्यक तेल हे सुगंधित आणि सौंदर्यप्रसाधने निर्मिती वापरले जाते. ऊर्धपातन पद्धत वापरून दोतीच्या मधील तेल वेगळे काढले जाते.

या तेलामध्ये मी रसिन, निरोल, सित्रल इत्यादी घटक आहेत. गवती चहाचा उपयोग सूप, स्वास, वाईन, शीतपेये, मिठाई तसेच मासे इत्यादी अन्न पदार्थांची चव वाढवण्यासाठी गवती चहा वापरतात.जर भारताचा विचार केला तर भारतातील केरळ, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आसाम राज्यात गवती चहाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते.  गवती चहामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो. रोजच्या चहामध्ये गवती चहाची पाने वापरतात. तसेच औषधी निर्मितीमध्ये देखील गवती चहाचा वापर केला जातो.

गवती चहामध्ये फेनोलस आणि  फ्लेओनॉईड इत्यादी फायटो केमिकल्स असतात.  केरळ राज्यामध्ये गवती चहापासून तेल काढण्याचे उद्योग विकसित झाला आहे. तसेच साठवण्याच्या धान्यांमध्ये कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात. तेल काढलेल्या पानांच्या चौथ्या पासून कागद निर्मिती करता येते. गवती चहाची पावडर तर पशुखाद्यात वापरली तर जनावरांची रवंथ करण्याची क्षमता वाढते.

 

गवती चहाचे आरोग्यदायी फायदे

 गवती चहामध्ये असलेल्या फायटोकेमिकल्स मुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत मिळते. गवती चहाचे तेल हे उत्तेजक, वेदनाशामक असल्यामुळे जंतुनाशक,रेचक, उपदंशी,  त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.  तसेच सर्दी, खोकला, पोट दुखी, डोकेदुखी आणि तणावग्रस्त परिस्थितीवर प्रभावी पारंपारिक औषधी म्हणून उपयोगात येते.शारीरिक थकवा किंवा डोकेदुखी घालवण्यासाठी उपाय म्हणून गवती चहा उपयोगी असते. 

 

ज्या व्यक्तींना संधिवाताचा त्रास असतो अशा रुग्णांनी हा चहा  पिणे योग्य ठरते. तसेच गवती चहाचा अर्क हा लठ्ठपणा, दाह आणि अतिरिक्त दाब कमी करण्यास मदत करतो. तसेच गवती चहा मध्ये असलेले अत्यावश्यक तेल हे घशातील सूज,  हिरड्या तील सूज, आतड्यातील सूज विषाणूच्या संसर्गामुळे होणारा जठराचा व आतड्याचा दाह, श्वासोच्छवासाचा संसर्ग रोग आणि घशातील दुखणे यावर रामबाण उपाय आहे. तसेच ग तिच्यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेसाठी फायदेशीर असते.

English Summary: Healthy Tea: Drink herbal tea to relieve headaches
Published on: 23 March 2021, 12:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)