आपण मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात काकडी खात असतो. तुम्ही खाता की नाही? खात नसाल तर उन्हाळ्यात आवर्जून काकडी खावी. याने शरीराला थंडावा तर मिळतोच पण त्यात भरपूर पोषक तत्वे देखील असतात जे की, आपल्या आरोग्याला विशेष फायदेशीर ठरतात. काकडीत व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे काकडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया काकडी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते पोषण मिळते आणि याचे अजून काय फायदे होतात.
»शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते: काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकते. यामध्ये 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते, ज्याच्या मदतीने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात.
»मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर: काकडी केवळ तुमचे शरीर निरोगी ठेवत नाही, तर ती मानसिक आरोग्यासाठीही चांगली मानली जाते. काकडीत फिसेटीन नावाचे तत्व असते जे मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाते. एका संशोधनानुसार, काकडी खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होण्यासारखी समस्या उद्भवत नाही.
»पचनास मदत करते: काकडीमध्ये आढळणारे फायबर घटक पचन प्रक्रियेत मदत करतात. यामुळे काकडी खाल्ल्याने बद्धकोष्ठता सारखी समस्या दूर होते.
»कर्करोगाचा धोका कमी होतो: काकडीत लिग्नॅन्स आर पॉलीफेनॉल हा घटक असतो. जे गर्भाशय, स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करतात. काकडी मध्ये क्युकर्बिटॅसिन असतात, जे कर्करोगविरोधी घटक मानले जातात.
»शरीर थंड ठेवते: जर तुम्ही काकडी खाल्ली असेल तर आपण दिवसभर पाणी पिले नाही तरी चालू शकते कारण की, काकडी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. काकडी खाल्ल्याने उष्माघात, त्वचेची ऍलर्जी आणि सनबर्नपासूनही आराम मिळतो. ज्या ठिकाणी हे त्वचेचे आजार असतील तिथे काकडीची लावावी.
»किडनी निरोगी ठेवते: काकडी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्यामुळे शरीराची यंत्रणा व्यवस्थित चालते. काकडीचा रस प्यायल्याने किडनी निरोगी राहते. यामुळे उन्हाळ्यात न चुकता काकडीचे सेवन केले पाहिजे.
Published on: 20 April 2022, 07:30 IST