Health Tips: दुधात भरपूर पोषक घटक असतात. अशा परिस्थितीत डॉक्टर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला देतात. पण तज्ज्ञांच्या मते, अशा अनेक पदार्थ आहेत, जे आपण कधीही दुधासोबत खाऊ किंवा पिऊ नये. हे पदार्थ दुधात मिसळणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत हे पदार्थ.
मासे अन दूध सोबत सेवन करू नये
दुधाचा थंड प्रभाव असतो तर मासे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते. अशा परिस्थितीत हे दोघे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. हे मिश्रण शरीरात असंतुलन निर्माण करण्याचे काम करते. त्यामुळे शरीरात रासायनिक बदलही होऊ लागतात. जर तुम्ही हे दोन्ही एकत्रपणे सेवन करत असाल तर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
फळांसह दूध
फळे खाल्ल्यानंतर अनेकजण दूध पितात. तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर असं करू नका. दूध पोट साफ करण्याचे काम करते, तर फळांमध्ये नैसर्गिक मीठ आणि पाणी असते, जे मूत्राद्वारे मूत्रपिंड स्वच्छ ठेवण्यास मदत करते. त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरातील पचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे शरीरात विषाचे प्रमाण वाढते आणि उलट्या आणि जुलाबाची समस्याही सुरू होते.
काय सांगता! 'या' सरकारी योजनेत 1 लाख गुंतवा आणि 2 लाख कमवा, पैसे दुप्पट होतात; वाचा डिटेल्स
मुळा आणि दूध-
अनेकजण मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूध पितात. मुळा गरम असून दुधासोबत घेतल्याने पोटात जळजळ होते. मुळा आणि दूध एकत्र सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या देखील उद्भवतात. तज्ज्ञांच्या मते, मुळा पासून बनवलेले काहीही खाल्ल्यानंतर किमान दोन तासांनंतरच दूध प्या.
दुधाबरोबर आंबट पदार्थ खाऊ नये
दुधासोबत आंबट किंवा आम्लयुक्त पदार्थ कधीही खाऊ नयेत. व्हिटॅमिन-बी फळे दुधात मिसळून खाणे टाळा. दूध पचायला आधीच वेळ लागतो. लिंबू किंवा कोणतेही आंबट फळ दुधासोबत खाल्ल्यास ते पोटात जाते आणि घट्ट होऊ लागते. त्यामुळे सर्दी, खोकला, पुरळ, अॅलर्जी होण्याची भीतीही कायम असते.
याला म्हणतात यश…! भाजीपाला विकणारा आज बनला न्यायाधीश, वाचा न्यायाधीश शिवाकांतची प्रेरणादायी कहाणी
केळी आणि दूध
तुम्ही पाहिलं असेल की, अनेक लोक दूध आणि केळीच्या मिश्रणाला खूप आरोग्यदायी मानतात आणि ते रोज सेवन करतात, पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केळी आणि दूध एकत्र घेतल्याने खूप जड जाते. आपल्या शरीराला ते पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे व्यक्तीला थकवाही जाणवतो. अशा स्थितीत या दोन्हीचे सेवन वेगळे-वेगळे करावे.
Published on: 11 June 2022, 10:38 IST