Health

Health Tips| ऑफिसमध्ये काम करणारे लोक 8-9 तास सतत काम करत राहतात, जे आरोग्यासाठी (Human Health) खूप धोकादायक ठरू शकत. खरं तर, यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे.

Updated on 23 July, 2022 5:38 PM IST

Health Tips| ऑफिसमध्ये काम करणारे लोक 8-9 तास सतत काम करत राहतात, जे  आरोग्यासाठी (Human Health) खूप धोकादायक ठरू शकत. खरं तर, यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे.

तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की, जे लोक जास्त वेळ बसून काम करतात ते बहुतेक आजारीचं असतात. चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तासनतास बसून काम केल्याने होणाऱ्या भयंकर आजारांबद्दल सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया जास्त वेळ बसून राहणे आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरत आहे.

जास्त वेळ बसल्याने हा आजार होऊ शकतो

हृदयरोग

जे लोक सतत अनेक तास काम करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका खूप वाढतो. वास्तविक, सतत बसल्यामुळे आपले शरीर चरबी जाळू शकत नाही, ज्यामुळे फैटी एसिड रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतात. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा धोका असतो.

शरीरात वेदना होणे 

जर तुम्ही अनेक तास सतत बसलात, तर साहजिकच तुम्हाला मान, खांदे आणि पाठ अशा शरीराच्या विविध भागात वेदना होऊ शकतात. जे लोक योग्य मुद्रेत बसत नाहीत किंवा फक्त बराच वेळ बसतात त्यांच्यामध्ये या समस्या खूप सामान्य आहेत.

मेंदूवर परिणाम होणे 

अभ्यासात हे देखील स्पष्ट झाले आहे की, जे लोक जास्त वेळ बसतात त्यांच्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्या देखील दिसून येतात. वास्तविक, जास्त वेळ बसल्याने मेंदूतील नवीन आठवणी निर्माण करणाऱ्या कणांवर वाईट परिणाम होतो, त्याचा स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम होतो.

वजन वाढणे

बराच वेळ बसून राहिल्याने आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते हे सर्वांनाच माहीत आहे. बसल्यामुळे होणाऱ्या समस्यांपैकी ही सर्वात सामान्य समस्या आहे.

English Summary: health tips If you sit for a long time and work, 'these' can cause serious diseases
Published on: 23 July 2022, 05:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)