Health Tips : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. या हंगामात हिरवी-हिरवी मेथीची भाजी देखील मिळते. लोक मेथीची भाजी पराठ्यामध्ये वापरतात. ती खायला चविष्ट असते, तसंच मेथी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. बाजारात मेथीची भाजी दिसली तर ती आपण घेऊ शकता. चला जाणून घेऊया मेथीच्या भाजीचे फायदे.
वजन :- मेथीच्या पानांमध्ये फायबर आढळते, ज्यामुळे मेथीची भाजी खाल्ल्यानंतर भूक लागत नाही. तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. मेथी दाणे वजन कमी करण्यातही गुणकारी आहेत. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही आहारात या हिरव्या भाजीचा समावेश करू शकता.
रक्तातील साखर :- जर तुमच्या रक्तातील साखर जास्त असेल तर तुम्ही मेथीच्या पानांचे सेवन करू शकता. यात मधुमेह नियंत्रित करण्याचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
पचन :- याच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला पोटात गॅस आणि जडपणाची समस्या असेल तर तुम्ही मेथीच्या पानांचे सेवन करू शकता.
हृदयासाठी फायदेशीर :- मेथीची पाने हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते अनेक हृदयरोगांपासून संरक्षण करू शकतात. हृदयरोगी या पानांचे सेवन करू शकतात.
कोलेस्ट्रॉल:- शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशावेळी तुम्ही मेथीच्या पानांचे सेवन करू शकता. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त आहे.
हॅलिटोसिस :- तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही मेथीच्या पानांचे सेवन करू शकता. या पानांचा चहा तुम्ही पिऊ शकता. श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. मेथीची पाने तोंडासंबंधित समस्यांवर मात करण्यासाठी देखील मदत करू शकतात.
Disclaimer :- सदर लेखात दिलेल्या टिपा आणि युक्त्या केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि याला व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Published on: 04 November 2022, 10:55 IST