Health

Health Tips धने आपल्या दैनंदिन आहारात वापरला जाणारा मसाल्यातील एक घटक आहे, प्रत्येकाच्या घरात रोज याचा भाज्यांमध्ये तसेच मसाल्यात वापर केला जातो. धन्याचे आपण नेहमीच सेवण करत असतो. पण त्यापासून अजून बरेच फायदे शरीराला होतात. धने हे औषध म्हणून वापरले जाऊ शकते. खरं पाहता धने शुगर आणि हाय ब्लड प्रेशर साठी अत्यंत गुणकारी औषध आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया धन्याचे आश्चर्यकारक फायदे.

Updated on 22 June, 2022 11:54 PM IST

Health Tips धने आपल्या दैनंदिन आहारात वापरला जाणारा मसाल्यातील एक घटक आहे, प्रत्येकाच्या घरात रोज याचा भाज्यांमध्ये तसेच मसाल्यात वापर केला जातो. धन्याचे आपण नेहमीच सेवण करत असतो. पण त्यापासून अजून बरेच फायदे शरीराला होतात. धने हे औषध म्हणून वापरले जाऊ शकते. खरं पाहता धने शुगर आणि हाय ब्लड प्रेशर साठी अत्यंत गुणकारी औषध आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया धन्याचे आश्चर्यकारक फायदे.

भारतातील प्रत्येक घरात कुठला ना कुठला आजार आढळत आहे. अशा स्थितीत मधुमेह हा गंभीर आजार आहे व सर्वत्र पसरलेला आहे, पण  घाबरू नका यावर ही आहे आपल्याकडे  घरगुती उपाय आहेत. आजच्या युगात प्रत्येक दुसरा माणूस या आजारातून वावरत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपली ढासळलेली जीवनशैली.

नीट खाणे किंवा योग्य आहार न घेणे, खाण्यावर नियंत्रण नसणे या सर्व गोष्टी या आजारांचे मूळ आहे. पण घरात मिळणाऱ्या धन्याचे फायदे जाणून घेतल्यास या सर्व आजारांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या धन्याबद्दल सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता.

हाय ब्लड प्रेशर सुद्धा दूर करू शकता. धने, आपण आपल्या किचन मध्ये प्रत्यक भाजीमध्ये वापरत असतो. धन्यात खरं पाहता अनेक औषधी गुणधर्म असतात. धने सहसा आपल्या सर्व्याच्या किचन मध्ये एक सामान्य मसाला म्हणून उपयोगात आणले जाते. मात्र हा केवळ एक मसाल्याचा पदार्थ नसून त्याचे उत्कृष्ट आरोग्यदायी फायदे जाणून तुम्हीही आश्चर्य चकित व्हाल.

कोथिंबीरच्या बियांमध्ये म्हणजेच धन्यामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकतात, भूक वाढवू शकतात, आणि पचन क्रिया सुधारू शकतात. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा धने टाकुन सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

याचा वापर आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो, पण तुम्हाला माहित आहे का? की कोथिंबीरच्या मधोमध असलेले पाणी अनेक फायदे देते. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी धणे हे सर्वात विश्वसनीय पारंपारिक उपायांपैकी एक आहे. कोथिंबीरच्या बियांच्या अर्कामध्ये संयुगे असतात,जे रक्तप्रवाहात सोडल्यास अँटी-हायपरग्लाइसेमिक, इन्सुलिन डिस्चार्जिंग आणि इन्सुलिन सारखी क्रिया घडते ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी राखण्यात मदत होते.

English Summary: Health Tips: Drinking coriander water has amazing benefits for the human body
Published on: 22 June 2022, 11:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)