Health

पाणी (Water) मानवी शरीराला (Human Body) अतिशय उपयुक्त आहे. मात्र असे असले तरी पाण्याचा आपल्या शरीराला फायदा होण्यासाठी त्याचे सेवन योग्य प्रकारे होणे अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी आपल्या शरीरासाठी औषधचं आहे, कारण की, पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

Updated on 08 May, 2022 12:36 PM IST

पाणी (Water) मानवी शरीराला (Human Body) अतिशय उपयुक्त आहे. मात्र असे असले तरी पाण्याचा आपल्या शरीराला फायदा होण्यासाठी त्याचे सेवन योग्य प्रकारे होणे अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी आपल्या शरीरासाठी औषधचं आहे, कारण की, पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

विशेषत: उन्हाळ्यात पाण्याची आपल्या शरीराला अधिक गरज असते. मात्र पाणी पिण्याची योग्य पद्धत (Proper method to Drink Water) माहित असणे गरजेचे आहे. यामुळे आज आपण पाणी पिताना कोणती चूक करू नये (Right way to drink water) याविषयी जाणून घेणार आहोत.

महत्वाच्या बातम्या:

Health News : रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्य येणार धोक्यात

Health: नेहमी वाढतो का ब्लड प्रेशर? मग करा हे योग आणि मिळवा कायमचा आराम

Weight Loss Tips : वजन कमी करायचं का? मग, वापरा 'या' घरगुती पद्धती आणि काही दिवसातच बना फिट

एकदाच पोटभर पाणी पिणे 

मित्रांनो जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही एकाच वेळी भरपूर पाणी पिता का? पाणी पिणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु एकाच वेळी जास्त पाणी पिणे योग्य नाही.  दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते, परंतु यापेक्षा जास्त पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.

जेव्हा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी शरीरात जाते तेव्हा ते इलेक्ट्रोलाइट्स पातळ करते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती उद्भवते. यामध्ये सोडियमची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे जास्त पाणी पिऊ नका विशेष म्हणजे एकाच वेळी जास्त पिऊ नका. नाही तर आपणास नाहक त्रास सहन करावा लागू शकतो.

पुन्हा-पुन्हा पाणी पिणे 

पाणी पुन्हा पुन्हा पिणे आपल्या आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. कारण जास्तीचे पाणी सोडियम आणि रक्तातील अतिरिक्त द्रवपदार्थ संतुलित करू शकत नाही. त्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. एडेमाचा धोका देखील वाढत असतो.

उभे राहून पाणी पिणे आहे चुकीचे 

आयुर्वेदानुसार, उभे राहून पाणी प्यायल्यास पोटावर जास्त दाब पडतो, कारण उभे राहून पाणी प्यायल्यास अन्ननलिकेच्या दाबाने पाणी पोटात लवकर पोहोचते. यामुळे पोट आणि पोटाभोवतीची जागा आणि पचनसंस्थेचे नुकसान होते.

जेवताना पाणी पिणे साफ चुकीचे 

जेवताना पाणी पिणे योग्य मानले जातं नाही. जर तुम्हाला अशी सवय असेल तर तुम्ही ती बदलावी असा सल्ला दिला जातो. अन्नासोबत पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या वाढते. पाणी तुमचे जठरासंबंधी रस पातळ करते, त्यांना पचण्यास कठीण बनवते, विशेषतः प्रथिने. एवढेच नाही तर यामुळे तुम्हाला अॅसिड रिफ्लक्सची समस्या देखील होऊ शकते. जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर पाणी प्यावे आणि जेवणानंतर 30 मिनिटे नंतर पाणी प्यावे.

खूप थंड पाणी पिणे टाळा 

कडाक्याच्या उन्हात फ्रिज मधले थंडगार पाणी पिणे टाळावे. जरी ते आपल्याला चांगले वाटत असले तरी हे तुमच्या वॅगस मज्जातंतूला हानी पोहोचवू शकते. जी रोगप्रतिकारक प्रणालीतील सर्वात लांब मज्जातंतू आहे.

एका दमात पाणी पिणे देखील चुकीचे 

जर तुम्ही एका दमात पाणी पिण्यास सुरुवात केली तर ही पद्धत तुमच्यासाठी नुकसानदेह सिद्ध होऊ शकते. असे केल्याने अनेक वेळा पाणी थेट छातीत जाऊन भिडते आणि त्यामुळे असह्य वेदना होतात. यामुळे मानवी अवयवांचे नुकसान देखील होऊ शकते.

English Summary: Health Tips: Be careful when drinking water? Drinking water in the wrong way can be harmful to health; Read the proper method of drinking water
Published on: 08 May 2022, 12:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)