नवी मुंबई: मूल जन्माला आल्यापासून ते वृद्धापकाळापर्यंत दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते, असे आपण पोषणतज्ञ आणि डॉक्टरांकडून ऐकले आहे. दुधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला जीवनसत्त्व मिळतात शिवाय अनेक प्रकारची प्रथिने देखील शरीराला मिळतात.
मात्र असे असले तरी, मानवी शरीराला कच्चे दूध चांगले कि उकळलेले दूध चांगले असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. यामुळे कच्चे दूध आरोग्यासाठी चांगले की उकळलेले दूध याविषयी आज आपण जाणून घेऊया. या दोन्हीपैकी कोणते दूध आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे तसेच कोणी दूध प्यावे किंवा पिऊ नये याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
दूध कच्चे प्यावे की उकळलेले?- जेव्हा दूध पिण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या मनात कायम असा प्रश्न येतो की दूध कच्चे प्यावे की उकळून? चला मग आज आपण जाणुन घेऊया याविषयी बहुमूल्य माहिती.
Business Idea 2022 : घरातच सुरु करा हा बिजनेस आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
कच्चे दूध प्यायल्यास काय होते?- खरं पाहता कच्चे दूध पिल्याने आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. यूएस हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या मते, कच्च्या दुधामध्ये एस्चेरिचिया कोला (ई. कोलाय) आणि लिस्टेरिया, साल्मोनेला इत्यादीसारखे अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात. कच्चे दूध प्यायल्याने अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवू शकते.
कच्चे दूध पिण्याचे दुष्परिणाम- कच्च्या दुधात असलेले बॅक्टेरिया आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात ज्यामुळे डायरिया, संधिवात आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
कच्च्या दुधात घाण असू शकते- कच्चे दूध पिणे हे हानिकारक आहे कारण की जनावराचे दूध काढतांना कासे दूषित असू शकतात. शिवाय, यासाठी स्वच्छ हात आणि स्वच्छ भांडी न वापरल्यास दूध दूषित होऊ शकते. म्हणूनच आपण दूध उकळल्यानंतर पिणे आवश्यक आहे, जेणेकरून दुधातील बॅक्टेरिया मरण पावतात.
Published on: 21 May 2022, 04:32 IST