मित्रांनो शरीर निरोगी ठेवायचे असेल आणि आजारांपासून कोसो दूर राहायचे असेल तर खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. आहार तज्ञ (Dietitian) सांगतात की, डाएट रूटीन नीट पाळले नाही तर शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
म्हणूनच आज आम्ही आपणांस काही सोप्या टिप्स (Health Tips Marathi) सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही निरोगी राहू शकता. आज आपण रात्री झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजेत याविषयी जाणून घेणार आहोत.
महत्वाच्या बातम्या:
रात्री हे पदार्थ खाऊ नका
कॉफी किंवा चहा- रात्रीच्या वेळी कॉफी किंवा चहाचे जास्त सेवन केल्यास निद्रानाश होऊ शकतो. त्याच वेळी, जे लोक दररोज रात्री कॉफी पितात त्यांना पोटाच्या चरबीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कॉफी किंवा चहाचे सेवन करू नये.
फास्ट फूड - जर तुम्ही रात्री झोपताना फास्ट फूडचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर यामुळे आपल्याला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रात्री फास्ट फूड खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते, तर पोटदुखीची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारखे पदार्थ कधीही खाऊ नये.
सोडा किंवा थंड पेय- अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी सोडा किंवा कोल्ड्रिंक्स पिण्याची सवय असते आणि मोठ्या आवडीने ते पितात, परंतु त्यांच्या सेवनाने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे निद्रानाशाची समस्या वाढते तसेच बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. यामुळे रात्री झोपताना सोडा किंवा थंड पेय पिणे टाळावे.
व्हिटॅमिन सी युक्त ज्यूस - रात्रीच्या वेळी ज्यूस सेवन करणे अनेकांना आवडते, परंतु रात्री ज्युस सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यूसचे सेवन रात्रीच्या वेळी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय ज्यूस ऍसिडचे प्रमाण वाढविण्याचे काम करते. यामुळे रात्रीच्या वेळी त्याचे सेवन करू नये.
Published on: 07 May 2022, 12:03 IST