Health

तांदुळजा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्याचा आहारामध्ये उपयोग करणे आवश्यक आहे. शरिराला आवश्यक असणाऱ्या सी जीवनसत्व साठी तांदूळज्याचीभाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे.

Updated on 05 February, 2022 3:03 PM IST

तांदुळजा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्याचा आहारामध्ये उपयोग करणे आवश्यक आहे. शरिराला आवश्यक असणाऱ्या सी जीवनसत्व साठी तांदूळज्याचीभाजी खावी. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे.

 उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व तीव्रता फार उपयुक्त आहे. विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मुळव्याध,यकृत व पाथरी वाढणे या विकारांमध्ये पथ्यकर म्हणून जरूर वापरावे. तसेच त्वचेचे समस्त विकार जसे की दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे. नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींकरिता, बाळंतीन तसेच गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे.डोळ्यामध्ये आग होणे,पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारी करिता फार उपयुक्त आहे. तसेच जुनाट मलावरोध विकारात देखील  आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला मळसुटा व्हायला तांदुळजा भाजी उपयुक्त आहे. आजच्या काळात आरोग्याची काळजी करणारे लोक सूपपिणे पसंत करतात. विशेष रुपात जेव्हा थंडीचा व पावसाचा ऋतू असतो तेव्हाच सूप यावेळी आणखीनच चवदार लागते.

तांदुळजा सूप बनवण्याची पद्धत

 हे सूप आरोग्यासाठी फारच लाभदायक मानले जाते. तरी बरेच जण सूप नापसंत करतात. लहान मुलांना सूप आरोग्यदायी असते  कारण ते पचायला हलके असते आणि त्यातील पोषक पटकन मिळवले जातात. तांदूळजायापासून बरेच डिशेश बनवले जातात.त्यापैकी तांदुळजा सूप एक सुंदर पदार्थ आहे.

 तांदुळजा सुप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • दीड ते दोन कप कापलेला तांदूळजा
  • एक ते चार बारीक कापलेला  कांदा
  • चार ते पाच लसुन पाकळ्यांना बारीक कापून घ्यावे
  • एक चमचा बेसन
  • एक चमचा जिरे पावडर
  • 1 तेजपान
  • एक कप पाणी
  • दिड चमचा बटर क्रीम
  • किसलेले पनीर
  • काळीमिरी बारीक पिसलेले मीठ

बनवण्याची कृती

  • सर्वप्रथम धूतलेली व चिरलेली तांदूळजा फ्रीजमध्ये ठेवावी.
  • पॅनमध्ये एक चमचा बटर घेऊन त्यामध्ये एक ते दोन मिनिटे तेजपान तळू द्यावे.
  • त्यामध्ये कापलेला लसूण व कांदा बारीक कापलेला सोडा त्यांना जळु द्यायचे नाही. कांदा-लसूण हलके लाल होईपर्यंत भाजा. यामध्ये फ्रीजमधील कापलेला तांदुळजा घालावा व चार ते पाच मिनिटे हलवत रहावे.
  • यात मीठ व काळे मीठ घाला व बेसन ही घाला.
  • एक मिनिट हे मिश्रण चांगले हलवा वयामध्ये दोन कप पाणी घाला. यातील तेजपान काढून द्या.
  • हे मिश्रण गॅसवर चांगले उकळून घ्या. चार ते पाच मिनिटे कमी तापमानावर ठेवा. त्यात वरून जीरे पूड घाला व नंतर गॅस बंद करा.
  • त्यात क्रीम टाकून चांगले ढवळा व त्यात अर्धा चमचा साखर घाला.
  • थंड झाल्यावर ब्लेंडर मध्ये घालून याचे मुलायम असे पातळ सुप होऊद्या.मिश्रण गॅसवर ठेवा आणि यामध्ये काळे मीठ आणि काळी मिरी पूड टाका.वरून किसलेले चीज ने सजवा.
English Summary: health benifit of tandoolja vegetable to take information about that
Published on: 05 February 2022, 03:03 IST