Health

कडधान्ये मोड आणून खाण्याची पद्धत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी जातात.जीवनसत्वांचे दुप्पट तिप्पट वाढ होते. क जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळ पणा कमी होतो. लोह व कॅल्शिअमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यांमध्ये तीन अशोषकद्रव्य असतात.

Updated on 30 August, 2021 6:22 PM IST

 कडधान्ये मोड आणून खाण्याची पद्धत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी जातात.जीवनसत्वांचे दुप्पट तिप्पट वाढ होते. क जीवनसत्त्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळ पणा कमी होतो. लोह व कॅल्शिअमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यांमध्ये तीन अशोषकद्रव्य असतात.

 प्रति ना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्त्वे, खनिजे आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. 100 ग्रॅम कडधान्यात थायमिन,रायबोफ्लेवीन 0.18 ते 0.26 मिली ग्रॅम आणि नायसिन 2.1 ते 2.9 मिलीग्राम असते.चुना 76 ते दोनशे तीन ग्रॅम, लोह 7.3ते 10.2 मिलीग्राम, स्फुरदतीनशे ते 433 मिली ग्रॅम या प्रमाणात असते. सोयाबीन अपवाद आहे त्यामध्ये 18 ते 20 टक्के मेद असते. कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, लवणे आणि मेद यांची एकत्रित उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधान्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 दररोजच्या आहारात आपण 40 ते 90 ग्रॅम मोड आलेल्या धान्याचा आहारात वापर करता येतो तसेच यापेक्षा जास्त ही आहारात वापर झाला तरी त्यापासून अपाय होत नाही. कारण ते नैसर्गिक आहार आहेत. मोड आलेली धान्य वजन व त्यांच्या मूळच्या वजनापेक्षा अडीचपट जास्त होते व एकदल धान्य ही त्यांच्या मूळच्या वजनापेक्षा दुपटीने वाढते. योग्य प्रमाणात वापर करण्यात येऊ शकतो.

 मोड आलेल्या धान्याची आरोग्यदायी फायदे

  • मोड आलेल्या धान्यांमध्ये व्हिटॅमिन-ईभरपूर प्रमाणात असते. विटामिन ई त्वचा आणि केसांना हेल्दी ठेवते. याच्या नियमित सेवनाने शरीर ऊर्जावान राहते. किडनी, ग्रंथी आणि तांत्रिक तंत्राची मजबुती तसेच नवीन रक्त कोशिकांचे निर्माण करण्यातही या धान्याची मदत होते. अंकुरित गावामध्ये उपलब्ध असलेले तत्त्व शरीरातील अतिरिक्त वसा शोषून घेण्याचे काम करतात.
  • मोड आलेल्या धान्यांमध्ये अँटिऑक्सिडंट, विटामिन ए,बी, सी आढळून येते. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न आणि झिंक मिळते.
  • मोड आलेल्या धान्यामुळे शरीरातील मेटाबोलिजम स्तर वाढतो. हे शरीरातील विषारी घटक शरीरा बाहेर काढण्यास मदत करते.
  • मोड काढण्याच्या प्रक्रियेत तर फळांमध्ये असलेले टॅनिन आणि फायटिक ऍसिड यांचे निरुपद्रवी द्रव्यात रूपांतर होते. त्यामुळे लोहाचे आणि चुन्याची शोषण वाढते. याचा शरीराला चांगला फायदा होतो.
  • मोड आलेली कडधान्य सुकवून ठेवता येतात.  अशा सुकवलेल्या मुळामध्ये कर्बोदकांचे आणि क जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर वाढते.
  • सुकविलेल्या मोड थोड्यावेळ पाण्यात टाकून पुन्हा टवटवीत करता येतात. अशी कडधान्य प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वाने समृद्ध असतात.
  • मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांचे पाचकताप्रथिने दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकताजवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृद्ध खजिना मोड आलेली कडधान्य आहेत.
  • मोड आलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हे शरीरालाफिट

ठेवतात यातू नमिळणाऱ्या प्रोटीनमुळे हाडे मजबूत होतात.

  • मोडकाढण्यापूर्वी 100 ग्रॅम कडधान्यांमध्ये क जीवनसत्त्व हे दो नते सहा मिलीग्राम असते. हेच प्रमाण मोडकाढल्यानंतर 27 ते 52 मिलीग्राम पर्यंत वाढू शकते.
  • मोड आलेले धान्य यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ह्याच्या सेवन केल्याने पाचन क्रिया सुधारते. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्टता, गॅस, ऍसिडिटी या सारख्या समस्या नष्ट होतात.
  • मोड आलेल्या धान्याचे दाणे चावून चावून खाल्ल्यास शरीरातील पेशी शुद्ध होतात. यामुळे नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते.
English Summary: health benifit of seedling legume
Published on: 30 August 2021, 06:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)