डाळिंब हे फळ आहार आणि औषध म्हणून अतिशय महत्वाचे फळ आहे. महाराष्ट्र हे डाळिंब उत्पादनात भारतात पहिला क्रमांक लागतो. तसेच भारतात गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात डाळिंब लागवड वाढत आहे.
डाळिंब हे फळ अतिशय पोस्टीक स्वरूपाचे असून त्यामध्ये पाणी कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ, लोह, रायबोफ्लेवीन आणि उष्मांक आढळतात. डाळिंब हे औषधी म्हणूनही उपयुक्त आहे. त्रिदोष तहान, मुख, कंठरोग, हृदय रोग, अतिसार त्यांचा नाश करते. तसेच डाळिंब फळाच्या सालीचा वापर अतिसार, संग्रहणी, रक्ती अतिसार, उपदंश, खोकला या विकारांमध्ये देखील होतो. तसेच डाळिंबाचा रस हा तापातील तहान भागवण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी आणि हृदयरोगात शक्ती प्रदान करण्यासाठी होतो. डाळींब फळाचा रस प्यायल्याने हृदय रोग होत नाही तसेच पोटातील आग शमते. घशातील व मुखातील रोग बरे होतात.
डाळिंब रसाच्या सेवनाने पचनसंस्थेवर भार न पडता शरीराला पोषक द्रव्य उपलब्ध होतात. डाळिंबाचा रस हा पाचक असून रक्त वाढविण्यात तेज आणि उत्साह वाढविण्यात मदत करतो.
तसेच डाळिंबाच्या मुळ्या या देखील आरोग्यदायी आहेत. डाळिंबाची साल आणि बियांचे चूर्ण व वातीच्या कपावर गुणकारी आहे. डाळिंबाची अपक्व फळे पचनास मदत करतात. तसेच ते शक्तिवर्धक असून उलट्या वर देखील गुणकारी आहेत. डाळिंब फळाच्या नियमित सेवनाने मेंदूचे आजार, मूत्रपिंडाचे विकार उद्भवत नाहीत. डाळिंबाच्या फळाची साल, फुल, लवंग, धने, मिरी किंवा दालचिनी यांचे मिश्रण अतिसारावर गुणकारी आहे. मलावरोध दूर होण्यासाठी मऊ बियांचे डाळिंब खूप उपयुक्त आहे. या फळात स्निग्धांशाचे प्रमाण कमी असल्यामुळे डाळिंब खाऊन कधीही मेदाची वृद्धी होत नाही. डाळिंब फळांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे डाळिंबाच्या सेवनाने पोटॅशियम यामुळे हृदय कार्यक्षम व निरोगी राहते.
डाळींब फळाचा रसाचे फायदे
- डाळिंबाचा रस पित्तनाशक आहे.
- रसातील क्षुदा वर्धक गुणामुळे भूक वाढते आणि पचन व्यवस्थित होते.
- डाळिंब रस हा सप्तधातु वर्धक आणि बलदायी आहे.
- डाळिंब रस हा हृदयरोग नाशक आहे.
- डाळिंब रसाचे सेवन खडीसाखरेबरोबर केल्यास पोटातील जळजळ, आंबट ढेकर आणि लघवीची आग कमी होते.
- ताप अधिक वाढल्यास घशातील कोरड, लघवीचा त्रास आणि जळजळ कमी करण्याकरता डाळींबाचा रस उपयुक्त आहे.
- डाळिंब रसामुळे शरीरातील उष्णतेचे विकार कमी होतात.
- फळातील रसाच्या ग्लुकोज व फ्रुक्टोज च्या साखरेमुळे रसाचे सेवन केल्यास लगेच ताजेतवाने वाटते.
- दीर्घ उपवासाला हे फळ फारच उपयुक्त आहेत.
- डाळींब फळाचा रस यकृत, हृदय व मेंदू चे आजार कमी करतो व कार्यक्षमता वाढवतो.
- डोळे आल्यास रसाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यास जळजळ थांबते.
- डाळिंब रस हा रक्तपिती या रोगावर गुणकारी आहे.
- डाळिंबाचा रस उच्च रक्तदाबावर देखील उपयोगी आहे.
Published on: 25 July 2021, 02:21 IST