Health

किवी हिरवट चॉकलेटी रंगाचे आंबट-गोड असे फळ आहे. प्रामुख्याने या फळाच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत. काही प्रजातींमध्ये या फळाच्या आतील भाग हा हिरवा असतो तर काहींचा पिवळ्या रंगाचा असतो. या फळाच्या गरामध्ये काळ्या रंगाच्या छोट्या खाणे योग्य बिया असतात

Updated on 19 November, 2021 9:15 PM IST

किवी हिरवट चॉकलेटी रंगाचे आंबट-गोड असे फळ आहे. प्रामुख्याने या फळाच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आहेत. काही प्रजातींमध्ये या फळाच्या आतील भाग हा  हिरवा असतो तर काहींचा पिवळ्या रंगाचा असतो. या फळाच्या गरामध्ये काळ्यारंगाच्या छोट्या खाणे योग्य बिया असतात

किवी फळ आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. हे फळ सालीसहित देखील खाता येते.या फळाच्या सालीमध्ये अनेक  पौष्टिक गुणधर्म असतात.या फळामध्ये जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. या लेखात आपण किवी फळाचे आरोग्यविषयक फायदे जाणून घेऊ.

किवी फळाचे आरोग्यदायी फायदे

  • यामध्ये जीवनसत्त्व कमुबलक प्रमाणात असते. जे लिंबू आणि संत्राच्या तुलनेत दुप्पट असते.
  • मधुमेही रुग्णांसाठी किवी फळ गुणकारी मानले जाते.ग्लायसेनिकइंडेक्स मध्ये किवीसर्वात खालच्या स्थानावर आहे. हे फळ खाण्याचा मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.
  • कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी किवी फळ उपयुक्त ठरते.किवी मधील क जीवनसत्व मध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात.
  • किवी फळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
  • या फळाच्या सेवनामुळे रक्तातील प्लेटलेट्स वाढतात.
  • या फळाच्या सेवनाने लोहखनिजाचे शोषण वाढते. त्यामुळे रक्तक्षय पासून संरक्षण मिळण्यास मदत होते.
  • हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी किवीचे सेवन फायदेशीर ठरते. जीवनसत्व क, इआणि पॉलिफिनॉल हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या निगडीत संरक्षण प्रदान करते.
  • तंतुमय पदार्थांचा उत्तम स्त्रोत म्हणून किवी फळ  ओळखले जाते.
  • किवी मधील जीवनसत्व इ आणि अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्वचा उजळण्यासाठी याची मदत होते.
English Summary: health benifit of kivi fruit eating kivi fruit get more benifit to body
Published on: 19 November 2021, 09:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)