ग्रीन टी हे एक आरोग्यदायी पेय म्हणून प्रसिद्ध आहे. इतर चहापेक्षा ग्रीन टी मध्ये एंटीऑक्सीडेंट जास्त प्रमाणात असतात. ग्रीन टी मधील फायटोकेमिकल्स, पॉलिफिनॉल,इंझाईम आणि अमिनो ऍसिड तुमच्या मनाला निवांत करतात.
तसेच ग्रीन टी मुळे त्वचा नितळ होते व चयापचयाचे कार्य सुधारते. या लेखात आपण ग्रीन टी चे आरोग्यदायी फायदे याविषयी माहिती घेऊ.
टाईप 2 डायबिटीज चा धोका कमी होतो – आज-काल टाइप 2 मधुमेह चे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास किंवा शरीरातील इन्सुलिनचे निर्मितीचे कार्य थांबल्यास तुम्हाला टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता असते.
- एका संशोधनानुसार दररोज सहा किंवा त्याहून अधिक ग्रीन टी घेतल्यास तुम्हाला टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता तीस टक्क्यांनी कमी होते. परंतु यासाठी किती प्रमाणात ग्रीन टी घ्यावी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.
- एंटीऑक्सीडेंट चा पुरवठा होतो- ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. ज्याचा प्रचंड फायदा होतो त्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्याने पेशींचे पोषण होते आणि नुकसान आपोआप कमी होते. ग्रीन टी पिणाऱ्या लोकांना हृदयरोग होण्याचा धोका 31 टक्क्यांनी कमी असतो असे आढळले आहे.
- कॅन्सरचा धोका कमी होतो - जेव्हा शरीरातील रोगाच्या पेशी अनियंत्रित प्रमाणात वाढतात तेव्हा कॅन्सरचा धोका वाढतो. ग्रीन टी मध्ये केटचीन सारखे ऑंटी ऑक्सीडेंट असतात त्यामुळे विविध प्रकारचे कँसरपासून बचाव होतो. त्याचप्रमाणे ग्रीन टी मधील पॉलिफिनॉल शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- ग्रीन टी मुळे चयापचयाचे कार्य सुधारते व फॅट्स बर्न होतात. ज्यामुळे सहाजीकच वजन आपोआप कमी होते तसेच पोट कमी करण्यासाठी ग्रीन टी फारच फायदेशीर आहे.
- दीर्घायुष्य प्रदान करते – ग्रीन टी हृदय विकार व कर्करोगावर फायदेशीर असते.ज्यामुळे तुमचे आयुष्य वाढू शकते. स्टॅनफोर्ड मधील एका संशोधनानुसार ग्रीन टी घेणाऱ्या लोकांमध्ये वयोमानानुसार येणाऱ्या समस्या कमी उद्भवतात व कार्यक्षमता कमी न झाल्याने तुम्ही निरोगी राहता हो तुम्हाला दीर्घायुष्य लाभते.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते – ग्रीन टी मधील कॅटेचीन वEGCG मध्ये नियामक टी पेशी वाढवण्याची क्षमता अधिक असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- पचनक्रिया सुधारते – ग्रीन टी हे एक पाचक पेय आहे. ग्रीन टी मधील कॅटेचीनमुळे तुमच्या पचन क्रिया येथील अडथळे दूर होतात व अन्न पोट आणि आतड्यांमध्ये अडकून राहत नाही.
- दातांच्या समस्या पासून मुक्तता- ग्रीन टी पिल्याने तुमच्या दातांमध्ये जंतुसंसर्ग कमी प्रमाणात होतो. ग्रीन टी मधील पॉलिफिनॉल दातांचे जंतूंपासून पासून संरक्षण करते. ज्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य सुधारते.
- डिप्रेशन च्या उपचारामध्ये मदत – एका संशोधनानुसार जे लोक दररोज चार कप ग्रीन टी घेतात त्यांना नैराश्याची समस्या कमी प्रमाणात होते.
- ऊर्जा आणि सहनशक्ती वाढते- ग्रीन टी मधील कॅटेचीनमुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि सहनशक्ती वाढू लागते. ज्यांना काम करताना कंटाळा घालवण्यासाठी आता फ्रेश वाढण्यासाठी कॉपी घ्यावी असे वाटत असेल त्यांनी कॉफी ऐवजी ग्रीन टी घेण्यास काहीच हरकत नाही.
टीप-( कोणत्याही औषध उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा )
Published on: 28 August 2021, 12:13 IST