Health

मित्रांनो अलीकडे वाढते आजार हि चिंतेची बाब बनत चालली आहे आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे मानवाची बदलत चाललेली जीवनशैली आणि बदलत चाललेला आहार आहे. रोगापासून वाचण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. दाळीचे सेवन करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि डॉक्टर देखील दाळीचे आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.

Updated on 19 November, 2021 10:37 AM IST

मित्रांनो अलीकडे वाढते आजार हि चिंतेची बाब बनत चालली आहे आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे मानवाची बदलत चाललेली जीवनशैली आणि बदलत चाललेला आहार आहे. रोगापासून वाचण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. दाळीचे सेवन करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि डॉक्टर देखील दाळीचे आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.

म्हणुनच मित्रांनो आज आपण मुंग दाळ खाल्ल्याने काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. मुंग दाळमध्ये अनेक पौष्टिकतत्वे असतात त्यामुळे ह्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरास अनेक चांगले फायदे होतात. मुंग दाळ हि चवीला खुपच स्वादिष्ट असते शिवाय हि आरोग्यासाठी खुपच फायदेशीर असते म्हणून मुंगदाळचे सेवन हे अवश्य केले पाहिजे. मुंग दाळ हि इतर दाळीच्या तुलनेत अधिक पौष्टिक असते, मुंग दाळ मध्ये व्हिटॅमिन भरपुर प्रमाणात असतात. मुंगदाळ मध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ए, बी, सी, आणि ई मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे याचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. मुंग दाळ मध्ये पोटॅशिअम, आयरन, कॅलसिअम ह्यांची मात्रा अधिक असते. ह्याचे नियमित सेवन केल्याने देखील आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाहीत हि एक चांगली बाब आहे. मुंगदाळ मध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीडायबेटिक गुणधर्म देखील आहेत हे गुणधर्म अनेक रोग बरे करण्यास मदत करतात. मुंगदाळला सामान्यतः पेशन्टसाथीचे अन्न म्हणून ओळखले जाते कारण मुंगदाळ हि पचायला हलकी असते. मुंगडाळीच्या नियमित सेवनाने शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होऊ शकते. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मूग डाळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.

मुंगदाळ खाल्ल्याने हे होतात आश्चर्यकारक फायदे

»जसं की आपण आधी बघितलं की, मुंगदाळ खाल्ल्याने कॅलरी वाढत नाहीत. तसेच मुंगदाळ हे रक्त प्रणालीतील उच्च कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करण्यास मदत करते.  मित्रांनो पॉलिश केलेल्या मुंगदाळ पेक्षा हिरवी मुंगदाळ नियमित सेवन करण्याचा सल्ला हा दिला जातो. हिरवी मुंगदाळ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि धमन्या आणि नसांची लवचिकता ह्यात सुधारणा होते. त्यामुळे आपला रक्तदाबही हा नियंत्रित राहतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यानी आपल्या आहारात हिरव्या मुंगाचा समावेश करावा असा सल्ला हा दिला जातो.

»ज्यांना लठ्ठपणा आहे व आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी मूग डाळीचे सेवन करावे असे सांगितलं जाते. मुंगदाळ मध्ये 100 पेक्षा कमी कॅलरीजचे प्रमाण असते आणि मुंगदाळ खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरलेले राहते ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाहीत आणि त्यामुळे साहजिक तुम्ही अतिरिक्त कॅलरीज घेत नाही.

शिवाय मुंगदाळ पचायला सोपी असते त्यामुळे पोट खराब होत नाही.

»जसं की आपणांस आधी सांगितले की, मूग डाळीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म हे भरपुर प्रमाणात आढळतात. तसेच मुंगदाळमध्ये काही फ्लेव्होनॉइड्स देखील असतात. मुंगदाळ मध्ये असलेले हे गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास खुप मदत करतात. म्हणून असे सांगितले जाते की, तणाव टाळण्यासाठी आपल्या आहारात मुंगदाळचा समावेश करावा, जेणेकरून आपण स्ट्रेस फ्री राहाल आणि त्यामुळे आपले शरीर स्वस्थ राहील.

 टीप :- सदर आर्टिकल मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची कृषी जागरण पुष्टी करत नाही. या फक्त सूचना आहेत याचा उपयोग माहिती म्हणुन घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English Summary: health benifit of eating mood daal keep fit and healthy
Published on: 19 November 2021, 10:37 IST