Health

वांगे हे भाजीपाला वर्गीय पीक असून ते सहजपणे उपलब्ध होते. वांग्या मध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असून वांग्याचे सेवन केल्याने बरेच आरोग्यदायी फायदे होतात.

Updated on 27 August, 2021 9:11 AM IST

 वांगे हे भाजीपाला वर्गीय पीक असून ते सहजपणे उपलब्ध होते. वांग्या मध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असून वांग्याचे सेवन  केल्याने बरेच आरोग्यदायी फायदे होतात.

 ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि झोपेशी संबंधित समस्या आहेत अशा व्यक्तींसाठी तर वांगे हे एक वरदानच आहे. वांग्याच्या भाजी मध्ये ऑंटी ऑक्सिडेंट  असतात आणि ते केवळ आपल्या रोगप्रतिकारक यासाठीच नव्हे तर आपल्या शरीराचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कमतरता दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. या लेखात आपण वांगे खाल्ल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

 वांगे खाल्ल्याने होणारे आरोग्यदायी  फायदे

  • वांग्यातखूपकमीकॅलरीजअसल्यामुळे एक कप शिजवलेल्या वांग्यातून तुम्हाला 35 कॅलरीज मिळतात. त्यातही पाणी भरपूर असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
  • वांगे भूक नियंत्रित करते. कारण वांग्यामध्ये भरपूर फायबर आणि बिया असतात त्यामुळे पोट बऱ्याच काळासाठी भरलेले राहते.
  • वांगे हे लोह आणि कॅल्शियमच्या समृद्ध असल्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी तसेच हाडांच्या  आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
  • वांगी मधुमेह नियंत्रित आणि व्यवस्थापित करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामुळे उच्च फायबर आणि  लो कार्बची मदत होते.
  • वांग्या मध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा एनिमिया सारख्या आजारावर असेलतर वांगी उपयुक्त आहेत तसेच वांग्यामध्ये कॅल्शियम ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तुमचीहाडे मजबूत होतात.
  • वांग्यामध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट घटकांमुळे तुम्हाला कॅन्सर या घटक आजारापासून वाचण्याचे काम करतात. तसेच फायबर असल्यामुळे तसेच कॅलरीज कमी असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी वांगी अवश्य खावी
  • फायबर, पोटॅशियम, विटामिन बी 6 हे घटक वांग्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला हृदयविकारापासून लांब ठेवते. तसेच कोलेस्टेरॉलचे प्रमाणही संतुलित राहते.
English Summary: health benifit of eating brinjaal
Published on: 27 August 2021, 09:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)