Health

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठी खूप लाभदायक आहे. यामुळे ड्रॅगन फ्रुट ची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुट पासून आईस्क्रीम,जेली आणि वाइन सुद्धा बनवता येते.सौंदर्य प्रसाधनांमध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो.

Updated on 26 August, 2021 1:31 PM IST

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठी खूप लाभदायक आहे. यामुळे ड्रॅगन फ्रुट ची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुट पासून आईस्क्रीम,जेली आणि वाइन सुद्धा बनवता येते.सौंदर्य प्रसाधनांमध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो.

 सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड,व्हियेतनाम,इस्राईल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे.यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असून त्यामुळे अनेक आजारांपासून आपला सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरते.या लेखात आपण ड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी फायदे याविषयी जाणून घेणार आहोत.

 ड्रॅगन फ्रुटचे आरोग्याला फायदे:

  • ड्रॅगन फ्रुट मध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.सोबतच कॅल्शियम,पोटॅशियम, लोह आणि विटामिन बी तसेच 90 टक्के पाणी असते. बाहेरून जाड साल असले तरी आज पांढरा आणि लाल गरअसतोआणि त्यात किवीसारख्या बिया असतात. त्या खाल्ल्या तरी चालतात. हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे.
  • ड्रॅगन फ्रुट मध्ये विटामिन सी असल्यानेशरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून कुठल्याच प्रकारचा रोग सहजासहजी होत नाही.
  • ड्रॅगन फ्रुटने सौंदर्य देखील वाढते. या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता तसेच केसांचा मास्क सुद्धा बनू शकता.ड्रॅगन फ्रुट च्या वापराने चेहऱ्यावरचे फोड,रुक्ष केस, केस गळणे,  उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी समस्येवरड्रॅगन फ्रुट रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि हे फळ खाण्याने तुम्ही तरुण रसरसलेली दिसतात.
  • ड्रॅगन फ्रुट मध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असल्याने पोट साफ राहते. सहाजिकच एकदा पोट साफ असले की 90% व्याधी नाहीशा होतात.म्हणजेच रक्तपुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात.त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते म्हणजेच डायबिटीसचाधोका टळतो.कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदयविकाराचा धोका देखील राहात नाही.तसेच यामध्ये बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब,हृदय विकार इत्यादी सर्वांवर मात करता येते.
  • या फळांमधील एंटीऑक्सीडेंट आणि विकरेकेसांचे सौंदर्य खुलवतात. यातील पॉलीसाचूरेटेडफॅट,ओमेगा-3 आणि ओमेगा 6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. यातील लोह रक्ताचीतील हिमोग्लोबिन वाढते आणि ॲनिमिया होऊ देत नाही.
  • ड्रॅगन फ्रुटचे आंबट फळ आहे तरी यामुळे संधिवाताचे वेदना कमी होतात. डेंगू झाल्यावर आपली हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती पण कमी होते.पण या फळांचे सेवन केले तर रोग प्रतिकारक शक्ती वाढतेत्याबरोबरच हाडे पण मजबूत होतात.
  • ड्रॅगन फ्रुट मध्ये लायकोपेन नावाचे विकर असल्यामुळे ते असलेल्या विटामिन सी बरोबर कॅन्सरला प्रतिबंध करतो. या फळांच्या सालीत पॉलिफिनॉल आणि रसायने असतात जे काही विशिष्ट कॅन्सरपासून संरक्षण करतात.
  • रक्ताल्पता असलेल्या ऍनिमिक गर्भवतींना रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी हिमोग्लोबिनचे मात्रा मिळते.  या फळाचे सेवन केल्याने गर्भवती मातांचे हिमोग्लोबिन वाढते.
  • हे फळ मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते.
English Summary: health benifit of dragon fruit
Published on: 26 August 2021, 01:31 IST