Health

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठी खूप लाभदायक आहे.यामुळे ड्रायगन फ्रुटचे दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.ड्रॅगन फ्रुट पासून आईस्क्रीम,जेलीआणि वाईन बनवता येते तसेच सौंदर्यप्रसाधनां मध्ये फेस पॅक म्हणून याचा वापर करण्यात येतो.

Updated on 18 September, 2021 9:02 AM IST

ड्रॅगन फ्रुट शरीरासाठी खूप लाभदायक आहे.यामुळे ड्रायगन फ्रुटचे दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.ड्रॅगन फ्रुट पासून आईस्क्रीम,जेलीआणि वाईन बनवता येते तसेच सौंदर्यप्रसाधनां मध्ये फेस पॅक म्हणून याचा वापर करण्यात येतो.

 सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, इस्राईल, व्हिएतनाम आणि श्रीलंके मध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असून त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरते.या लेखात आपण ड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

 ड्रॅगन फ्रुट चे आरोग्याला होणारे फायदे

  • ड्रॅगन फ्रुट मध्येजास्तप्रमाणात विटामिन सी असते. त्यासोबतच कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी तसेच 90 टक्के पाणी असते.बाहेरून जाड साल असली तरी आत पांढरा आणि लाल गर असतो आणि त्यात किवी सारख्या बिया असतात. त्या खाल्ल्या तरी चालतात. हे फळ म्हणजे सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे.
  • ड्रॅगन फ्रुट मध्ये विटामिन सी असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून कुठल्याच प्रकारचा रोग सहजासहजी होत नाही.
  • ड्रॅगन फ्रुट च्यासेवनाने सौंदर्य  देखील वाढते. या फळाने तुम्ही फेस मास्क बनवू शकता तसेच केसांचा मास्कसुद्धा बनवू शकता. ड्रॅगन फोटो च्या वापराने चेहऱ्यावरचे फोड, रुक्ष केस, केस गळणे,उन्हाने काळवंडलेली त्वचा यावर ड्रॅगन फ्रुट  रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करते आणि फळ खाण्याने तुम्ही तरुण रसरसलेली दिसतात.
  • ड्रॅगन फ्रुट मध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असल्याने पोट साफ राहते. सहाजिकच एकदा पोट साफ असले की 90 टक्के व्याधी नाहीशा होतात. म्हणजेच रक्तपुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते,रक्तातील साखर कमी राहते म्हणजेच डायबिटीज चा धोका टळतो. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदयविकाराचा धोका देखील राहत नाही. तसेच यामध्ये बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदय विकार इत्यादी सर्वांवर मात करता येते.
  • या फळांमधील एंटीऑक्सीडेंट आणि विकरे केसांचे सौंदर्य खुलवतात. यातील ओमेगा-3 आणि ओमेगा 6 वाईटकोलेस्टेरॉललावाढू देत नाही.तसेच यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि ॲनिमिया होऊ देत नाही.
  • ड्रॅगन फ्रुट हे आंबट फळ आहे तरी त्यामुळे संधिवाताची वेदना कमी होतात. डेंग्यू झाल्यावर आपली हाडे कमजोर होतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती पण कमी होते.पण या फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याबरोबर हाडे पण मजबूत होतात.
  • ड्रॅगन फोटो मध्ये लायकोपेन नावाचे विकर असल्यामुळे ती असलेल्या विटामिन सी बरोबर कॅन्सरला प्रतिबंध करते. ड्रॅगन फ्रुट च्या सावलीत पॉलिफिनॉल आणि रसायने असतात. जे काही विशिष्ट कॅन्सरपासून संरक्षण करतात.
  • रक्ताल्पता असलेल्या ऍनिमिक गर्भवतींना रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते आणि बाळाला कमी हिमोग्लोबिनची मात्र मिळते. या फळाचे सेवन केल्याने गर्भवती मातांचे हिमोग्लोबिन वाढते. हे फळ मधुमेह नियंत्रित करण्याचे काम करते.
English Summary: health benifit of dragon fruit (1)
Published on: 18 September 2021, 09:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)