Health

आपल्या महाराष्ट्रमध्ये विविध ठिकाणी चिकन बनवण्याचे विविध प्रकार आहेत. आपल्याकडे मांसाहार हा जेवणाचा अविभाज्य भाग आहेत. या मांस आहाराचे शरीराला होणारे फायदे हि तेवढेच चांगल्या प्रकारचे आहेत. मावस आहारातून शरीराला प्रोटिन चा पुरवठा होतो.

Updated on 11 July, 2021 10:48 AM IST

आपल्या महाराष्ट्रमध्ये विविध ठिकाणी चिकन बनवण्याचे विविध प्रकार आहेत. आपल्याकडे मांसाहार हा जेवणाचा अविभाज्य भाग आहेत. या मांस आहाराचे शरीराला होणारे फायदे हि तेवढेच चांगल्या प्रकारचे आहेत.  मावस आहारातून शरीराला प्रोटिन चा पुरवठा होतो.

चिकन मधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अत्यल्प प्रमाणात मेद शरीराला मिळते. 100 ग्रॅम भाजलेल्या चिकन मधून 31 ग्राम प्रोटीन मिळते. त्यामुळे आपली शरीरयष्टी सुधारण्यासाठी आणि पिळदार  शरीरासाठी  हे नक्कीच फायदेशीर आहे. या लेखात आपण चिकन खाण्याचे काही  आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ.

  • स्नायू बळकट होतात: मांसहारातून शरीराला प्रोटीनचा पुरवठा करणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चिकन होय. कमी मांस असलेल्या चिकन मधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अत्यल्प प्रमाणात मेद मिळते. 100 ग्रॅम भाजलेल्या चिकन मधून 31 ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे शरीर बळकट होण्यास मदत होते.
  • हाडे बळकट होतात: प्रोटीन प्रमाणेच चिकन मधून फॉस्फरस, कॅल्शियम यासारखी आवश्यक मिनरल्सचा पुरवठा होतो. त्यामुळे हाडं बळकट होतात. चिकन मधील सेलेनियम घटक सांधेदुखीची समस्या कमी करते.
  • ताणतणाव कमी होतो: विटामिन बी 5 आणि ट्रापटोफन (tryptophan) चिकन मधून मिळणाऱ्या दोन घटकांमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरातील थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा चविष्ट चिकनची चव चाखायला काहीच हरकत नाही.
  • पीएमएस च्या (pre-menstrual syndrom) समस्या कमी होतात: चिकन मधून मिळणारे मॅग्नेशियम घटक पी एम एस या पाळी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते तसेच या दिवसात होणारे मूड स्विंग्स टाळण्यासाठी मदत होते.
  • टेस्टोस्टेरोन ची पातळी वाढवते: चिकन मधून मिळणारे झिंक घटक पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन ची पातळी वाढवण्या सोबतच शुक्राणूंची संख्या देखील वाढण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते: सर्दी खोकला आणि इतर श्‍वसनाच्या विकारांमध्ये चिकन सूप अत्यंत फायदेशीर आहे. हे सूप गरम पिल्यास चोंदलेले नाक आणि घशातील खवखव कमी होते.
  • तसेच संसर्गापासून बचाव पासून आराम मिळतो.एका संशोधनातून पुढे आलेली बाब म्हणजे चिकन सूप न्यूट्रोफिल्स या इमू सेल्सचे स्थलांतर रोखते. परिणामी संसर्गजन्य रोगापासून आपला बचाव होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • हृदयाचे आरोग्य सुधारते: चिकन मध्ये विटामिन बी6 मोठ्या प्रमाणात असल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी करण्यास मदत होते. या विटामिन मुळे होमो सीस्टाइन ची पातळी कमी होते परिणामी हृदयविकाराचे प्रमाणही मंदावते. याचसोबत चिकन मधून मिळणारे नायसीन घटक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनने च्या संशोधनानुसार रेडमीट खाण्याऐवजी चिकन खाणे हा एक हेल्दी उपाय आहे. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असते तसेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चा मुबलक  पुरवठा होतो. त्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते.
English Summary: health benifit of chicken
Published on: 11 July 2021, 10:48 IST