Health

मित्रांनो आपण नेहमीच फळांचे सेवन करत असतो. यामध्ये आपण द्राक्ष देखील सेवन करतो. खरं पाहता द्राक्षामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर देखील ठरतात. असे असले तरी, काळे द्राक्ष आणि हिरवे द्राक्षे उपलब्ध असल्याने यापैकी कोणते द्राक्ष आपल्यासाठी अधिक फायद्याचे आहे याबाबत आपल्या मनात नेहमीच शंका असते.

Updated on 28 April, 2022 10:31 PM IST

मित्रांनो आपण नेहमीच फळांचे सेवन करत असतो. यामध्ये आपण द्राक्ष देखील सेवन करतो. खरं पाहता द्राक्षामध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर देखील ठरतात. असे असले तरी, काळे द्राक्ष आणि हिरवे द्राक्षे उपलब्ध असल्याने यापैकी कोणते द्राक्ष आपल्यासाठी अधिक फायद्याचे आहे याबाबत आपल्या मनात नेहमीच शंका असते.

मित्रांनो जर तुमच्याही मनात याविषयी शंका असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, द्राक्षे काळे असो किंवा हिरवे त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म नेहमीच आरोग्याला चांगला फायदा देत असतात. आहार तज्ञांच्या मते, द्राक्षांचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते शिवाय यामुळे अनेक विकार देखील दूर होतात. यामुळे आज आपण काळे द्राक्ष खावे की हिरवे द्राक्ष याविषयी जाणून घेणार आहोत.

काळी द्राक्ष खाण्याचे फायदे

  • काळ्या द्राक्षात असलेले औषधी गुणधर्म मानवी डोळ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत करते. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे सांगितले जाते.
  • काळ्या द्राक्षात अनेक औषधी गुणधर्म असतात यापैकीच एक आहे पोटॅशियम, या पोटॅशियम मुळे मानवी हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त या द्राक्षांमध्ये साईटोकेमिकल्स आढळतात जे की आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
  • यामध्ये विटामिन ई देखील मोठ्या प्रमाणात आढळते, जे की मानवी त्वचा आणि केसांना विशेष फायदेशीर असते.
  • याच्या सेवनाने मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते, कारण की यामध्ये विटामिन के मोठ्या प्रमाणात असते.
  • असे सांगितले जाते की काळे द्राक्ष खालल्याने किडनीचे आरोग्य देखील चांगले राहते.

हिरवी द्राक्ष खाण्याचे फायदे

  • हिरव्या द्राक्षेमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगितले जाते.
  • हिरव्या द्राक्षांमध्ये फायटोकेमिकल्स खूप अधिक असतात त्यामुळे उतारवयात मानवी मेंदूवर होणारा परिणाम कमी होत असल्याचे आहारतज्ञ सांगत असतात.
  • हिरव्या द्राक्षांचे सेवन केल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी मदत होते याशिवाय रक्त वाढीसाठी देखील याचा उपयोग होत असतो.

हिरवे आणि काळे द्राक्ष दोघांमध्ये वेगवेगळे गुणधर्म आढळतात. मात्र जरी असं असले तरी देखील हे दोन्ही द्राक्ष खाल्ल्याने मानवी शरीराला फायदा होत असतो. त्यामुळे आपणास जे द्राक्ष उपलब्ध होत असतील त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Important News :

Health Tips : उन्हाळ्यातच काकडी का खावी? वाचा याविषयी सविस्तर

Watermelon Health Benifits: 'या'मुळे टरबूज खाण्याचा दिला जातो सल्ला; याचे फायदे वाचून तुम्हीही अवश्य खाणार टरबूज

English Summary: Health Benefits: Should Black Grapes Eat Green? Learn about it
Published on: 28 April 2022, 10:31 IST