Health

आज आधुनिकीकरणामूळे बहुतेकजणांना धनगरी घोंगडी काय असते ते कदाचित माहितही नसावे.

Updated on 31 May, 2022 11:08 AM IST

सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ!गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ,मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो.

साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते.. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्‍याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे!धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.

झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडी चे महत्व: पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो.

स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता.घोंगडीचा वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोल मध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते.घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे.गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ,मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं. 

English Summary: Health benefits and religious significance of Dhangari blanket!
Published on: 31 May 2022, 11:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)