Health

केळ हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळी खाण्याचे फायदे आरोग्यावर नक्कीच चांगले होतात. केळी मध्ये पोटॅशियम, विटामिन बी 6, फायबर्स, कार्बोहायड्रेट्स आणि विटामिन सी असते. केळ्याची चव गोडसर आंबट असते ज्यामुळे लहान मुलांनाही केळी खूप आवडतात. शिवाय खेळ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार फळ आहे. केळ्यामध्ये पुरेसे पोषक तत्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम पटकन दिसून येतात. केळी मध्ये पोटॅशियम असल्यामुळे उपाशीपोटी एक केळं खाल्ल्यास तुम्हाला एनर्जी मिळते. या लेखात आपण केळीचे दहा आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

Updated on 17 July, 2021 4:55 PM IST

 केळ हे एक स्वस्त  आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळी खाण्याचे फायदे आरोग्यावर नक्कीच चांगले होतात. केळी मध्ये पोटॅशियम, विटामिन बी 6, फायबर्स, कार्बोहायड्रेट्स आणि विटामिन सी असते. केळ्याची चव गोडसर आंबट असते ज्यामुळे लहान मुलांनाही केळी खूप आवडतात. शिवाय खेळ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार फळ आहे. केळ्यामध्ये पुरेसे पोषक तत्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम पटकन दिसून येतात. केळी मध्ये पोटॅशियम असल्यामुळे उपाशीपोटी एक केळं खाल्ल्यास तुम्हाला एनर्जी मिळते. या लेखात आपण केळीचे दहा आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.v

 केळी खाण्याचे आरोग्यावर होणारे चांगले फायदे.

1 केळी खाल्ल्याने आपल्याला लगेच एनर्जी मिळते. सकाळी नाश्त्यात केळी खाल्ल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. केळी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. गॅसची समस्याही दूर करण्यास उपयुक्त ठरते.

2- जर तुम्ही सतत प्रवास करत असाल तर अशा वेळी फक्त केळी खाल्ल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. प्रवासादरम्यान केळी खाल्ल्याने कफाचा त्रास दूर होतो.

3- केळीत असणाऱ्या ट्रायफोटोपण मुळे मेंदू शांत राहतो. यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांसाठी केळी खूप फायदेमंद आहे.

 दररोज केळी खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

5- दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्ल्याने चांगली झोप येते. झोप न येण्याची समस्या दूर होते.

6- दररोज दोन केळी आणि मध खाल्ल्याने हृदयाच्या आजार कमी होतात.

7- नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास केळी, साखर आणि दूध यांचे सेवन केल्याने ही समस्या दूर होते.

8-

गर्भवती महिलांनी केळी जरूर खाल्ली पाहिजे.

9- केळी खाल्ल्याने मांसपेशी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत.

10- केळीच्या सालीची पेस्ट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.

English Summary: health benefit of bananna
Published on: 17 July 2021, 04:55 IST