भारतामध्ये पेरूची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेरूचे झाड साधारणतः विषुवृत्तीय व उष्ण हवामानात चांगले वाढते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेरू आतून पांढरा असतो आता आलेल्या पेरूचा आतला रंग हा लालसर असतो आणि वरचा भाग हिरवा असतो. पण पिकल्यावर वरील भागाचा रंग हा पिवळा होत असतो. पेरूचे सरबत हे आंबट-गोड असते. दरम्यान पेरूबद्दलची ही माहिती आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु पेरूची पाने आपल्या आरोग्यासाठी खासकरून त्वचेसाठी आणि केसांसाठी फारच उपयुक्त आहे. हे माहिती आहे का ? नाही ना मग आज आपण या आपण पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.
पेरूच्या पानांचे फायदे
जर आपल्याला पचनसंस्थेचे संबंधी काही समस्या असतील किंवा बऱ्याच जणांना पोटासंबंधी समस्या असतात. अशा लोकांसाठी पेरूच्या पानांचा रस पिणे फायदेशीर असते. एक कप पाण्यामध्ये पेरूची पाने टाकून ते पाणी उकळून त्याचा रस प्यायले तर खूप फायदा होत असतो. तसेच या रसाचा उपयोग मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी गुणकारी आहे. म्हणजेच पेरूचा रस जर आपण तर रोज घेतला तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच आपण पेरूची पाने पाण्यासोबत उकळून पिले तर दातांचे आरोग्य उत्तम राहते. दातांच्या समस्यांसाठी पेरूच्या पानांच्या रसासोबत पानांची पेस्ट सुद्धा उपयुक्त असते.
पेरूच्या पानांचे फायदे पुढील प्रमाणे.
शरीराला आलेला लठ्ठपणा जर घालवायचा असेल तर पेरूची पाने गुणकारी ठरतात. पेरूच्या पानांच्या चूर्णाने शरीरातील स्निग्धांश कमी होतात. बऱ्याच स्त्रियांना अंगावरून पांढरे पाणी जाण्याचा त्रास होतो. जर अशा स्त्रियांनी रोज सकाळ-संध्याकाळी पेरूच्या पानांचा रस घेतला तर ही समस्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
कधीकधी बर्याच जणांच्या शरीरावर ठिकाणी गाठी दिसतात. या गाठींसाठी पेरूच्या पानांची पेस्ट करावी आणि गाठींवर लावयची. यामुळे सूज कमी होऊन गाठी बऱ्यापैकी कमी होता. पेरूच्या पानाचा आणि लिंबू चारस एकत्र लावल्याने केसांमधील कोंडाची समस्या दूर होते. तसेच पेरूचे पान कढीपत्त्याच्या पानांसोबत मिक्स करून पाण्यात उकळून घेतले. आणि उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास पांढरे केस घालवता येतात.
बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात या सुरकुत्या कमी करण्यासाठी पेरूच्या पानांची पेस्ट करून चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावरचे अनावश्यक डाग कमी करण्यासाठी पेरूची पाने गरम पाण्यात उकळून दिवसातून दोनवेळा चेहरा धुतला तर डाग कमी होतात.
बऱ्याच जणांना तोंडाचा वास येण्याची समस्या असते. त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे पेरूची पाने बारीक चावून थुंकावी. केसांना जर जास्त तेल झाले तर पेरूची पाने पाण्यात टाकून त्या पाण्याने केस धुवावेत जास्तीचे तेल त्यामुळे निघून जाते व केस चमकदार होतात. बऱ्याच जणांना हिरड्यांची सूज व दात दुखीचा त्रास असतो. त्यासाठी पेरूची १५ ते २० कोवळी पाने कुसकरून पाण्यात उकळावी त्यानंतर ते पाणी अर्धे झाले की गार करावे व त्यात तुरटी व मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दात दुखीवर हिरड्यांची सूज कमी होते. पेरूची कोवळी पाने वाटून त्यांचा रस जर पिला तर ताप उतरतो. उलट्यांचा त्रास होत असेल तर पानांचा काढा केला तर उलट्यांचा त्रास बंद होतो.
Published on: 24 October 2020, 05:37 IST