शरीराला आवश्यक असणारी ए, बी ही व्हिटामिन, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. मूग हिरवे, पिवळे, काळे तीन प्रकारचे असतात. यापैकी हिरवे मूग हे औषधी आणि गुणकारी मानले जातात. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त असतात. मुगाला मोड आणून खाण्याने मुगाची गुणवत्ता वाढते. तुरट व मधुर रस असलेले मूग थंड गुणाचे असतात. मूग पचायला हलके आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहेत. मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मूग क्वचित पोटात वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावी. मुगाचे पिठले, सबंध मूग कढण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारे मूग उपयुक्त पडतात. मुगाची खीचडी, मुगवडा, मुगाचे भजे, मुगपापड, मुगउसळ प्रचंड आवडीने लोक खातात.
आज या मुगाविषयी जाणून घेऊया.याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात.पिवळय़ा मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक आहे. थोडी पिठीसाखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळय़ा मुगाचे पीठ उत्तम टॉनिक आहे. कृश मुले, दुपारी उशिरा जेवणारी मंडळी यांनी सकाळी चहाऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या मुगाच्या पिठाचे लाडू खावे. बाळंतिणीस भरपूर दूध येण्याकरिता मुगाच्या पिठाचे लाडू तत्काळ गुण देतात. शारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी. खूप लठ्ठ व्यक्तींनी मुगाची आमटी नियमित घ्यावी. कृश व्यक्तींनी मुगाची उसळ खावी. मुगामुळे मेद वाढत नाही, पण स्नायूंना बळ मिळते.आयुर्वेदीय वैद्य रोग्याला सर्वात जास्त खायला सांगतात ती डाळ म्हणजे मुगडाळ .डाळ म्हणजे हिरव्या टरफलासहित पाॕलीशची नव्हे.ही हिरवी डाळ कींवा मुग खायला सांगायच कारणही तसच आहे.
मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.रक्त शुद्ध व्हायला मदत होते. फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा 100 पट जास्त एंजाईम तुम्हाला मोड आलेले मूग खाल्याने मिळते.अंकुरीत म्हणजेच मोड आलेल्या मुगामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेट्री गुण असल्याने संधिवातात (अर्थारायटिस ) उपयुक्त ठरतात. अंकुरित मुगामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. भरपूर प्रमाणात प्रोटीन आल्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. मोड आलेले मुगामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने ब्लड-शुगर पातळी योग्य राखली जाते. तसेच याचे सेवन मधुमेही व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते.हाडीताप असलेल्या रुग्णांना हिरवेमुग आवळे टाकुन उकळुन खाऊ घालावे.याच्या सेवनाने शारिरीतलं विषारीद्रव्ये कमी होऊन त्वचा आणि शरीर निरोगी राहते.यामध्ये मेदाचे प्रमाण कमी असते त्यामुळे याच्या खाण्याने वजन वाढत नाही तर नियंत्रणात राहते.
यातील पॉलिफेनॉल्स कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात मुग उपयुक्त.शारीरिक कष्ट खूप करावयास लागणाऱ्यांनी रोज किमान एक वाटी मुगाची उसळ खावी.ज्यास्त घाम येणाऱ्यांनी मुगाचे पिठ लावून अंघोळ करावी.मुंलांची उंची व शरीराची वाढ होण्यास मुगडाळ नेहमी द्यावी.जिम (Gym) करण्यारया लोकांनी तयार (Readymade) प्रोटिन पेक्षा एक कप मुग व हरभरा रात्रभर भिजवून सकाळी खावं.पोटॕशिअम मुळे मुग ह्रदय मजबूत ठेवते.मुगाचे लाडू - हे लाडू शीतल , वीर्यवृद्धिकर, वातपित्तनाशक असे आहेत.मुगडाळ गर्भवतींचे लोह वाढविण्यासाठी उपयुक्त.गरोदर स्त्रियांना गरोदरपणात फोलेट नावाच्या एका पोषक तत्वाची मोठी गरज भासते. गरोदरपणाच्या निर्णायक काळात या पोषक तत्वाची गरज असल्याने स्त्रियांना फोलेटयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. पोटातील अर्भक पूर्णपणे विकसीत होण्यासाठी हे पोषक तत्व अतिशय गरजेचे असते. खासकरून गरोदर स्त्रियांना पहिल्या तिमाहीत फोलेटची गरज खूप भासते. अशावेळी मोड आलेले मुग उपयुक्त ठरू शकतात.
मुग हा फोलेटचा उत्तम स्त्रोत मानला जातो. म्हणून गरोदर स्त्रियांनी आठवड्यातून किमान २ वेळा तरी मोड आलेले हिरवे मुग अवश्य खावेत.यातील सायट्रोजन शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहतो.ज्वरामध्ये मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा. जीर्णज्वरांत ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त आहे.ओकारी, अतिसार, दाह व ज्वर यांवर - भाजलेल्या मुगांचा काढा लाह्या , मध व साखर घालून द्यावा .मोड आलेले मूग खाल्यास शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. यासोबतच याने ब्लड ग्लूकोजही कंट्रोलमध्ये राहतं. याने डायबिटीजची समस्या कमी करण्यास मदत होते अर्धागवात, संधिवात, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ, जलोदर, सर्दी-पडसे, खोकला, दमा, स्वरभंग या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक अन्न आहे. त्याकरिता मूग भाजून त्याचे नुसते पाणी किंवा कढण हे अर्धागवात, मधुमेह, रक्तदाबवृद्धी या विकारांत उपयुक्त आहे.घशाच्या, जिभेच्या, गळय़ाच्या कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणे त्रासाचे होते त्या वेळेस हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन:पुन्हा पाजावे. शरीर तग धरते.मधुमेहात भरपूर मूग खावे. थकवा येत नाही.
Published on: 23 May 2022, 08:15 IST