हिवाळ्यात लहना मुलांमध्ये न्यूमोनिया हा आाजार वेगाने पसरतो . न्यूमोनिया' म्हणजे फुफ्फुसात विषाणू , बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे झालेला संसर्ग. यामध्ये फुप्फुसांना सूज आल्याने त्या भागामध्ये कफ जमा होतो. या आजारात रुग्णाला खोकला, ताप येऊ लागतो. न्यूमोनिया हा सहसा विषाणूंमुळे होतो तर कधी हे बुरशीमुळे देखील होऊ शकते, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना हा आजार लवकर होतो. हा आजार वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागतो आणि रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होते आणि रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. लहान मुले, वृद्ध आणि इतर आरोग्य स्थिती असलेल्या लोकांना गंभीर न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.
न्यूमोनियाची लक्षणे -
श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणं.
जोरजोरात आणि कमी श्वास घेणं
हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढणं
ताप अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणं
कफ, छातीत दुखणं, नॉशिया, उलट्या होणं किंवा डायरिया
न्यूमोनियापासून बचाव करण्याच्या पद्धती -
लसीकरणाद्वारे देखील न्यूमोनिया टाळता येऊ शकतो.
हातांची स्वच्छता राखल्याने देखील न्यूमोनियापासून चांगले संरक्षण होते.
धूम्रपानामुळे फुफ्फुसे संसर्गाशी लढा देण्यास सक्षम नसतात. धूम्रपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे धूम्रपान टाळावे.
न्युमोनियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेवून वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे.
Published on: 04 December 2023, 06:43 IST