Health

आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये घर आणि ऑफिसच्या दुहेरी जबाबदारीमुळे चेहरा निर्जीव होतो

Updated on 23 May, 2022 8:28 PM IST

चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, खासकरून कपाळावरील सुरकुत्या चेहऱ्याचे सौंदर्यच खराब करत नाही तर आपण वयस्कर देखील दिसू लागता. तथापि या चिंतेचे मुख्य कारण थकवा, ताण-तानाव, चिंता, फास्ट फुड- जंक फुड आणि शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता. जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या कपाळावरील सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. कसे? जाणून घ्या सविस्तर.करा चेहऱ्याचा मसाज कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्या चेहऱ्याची नियमित मालिश केली पाहिजे. चेहऱ्याचा मसाज आपल्याला तणावातून आराम देतो, 

तसेच चेहरा तेजस्वी बनवतो आणि तिथला रक्त प्रवाह देखील वाढतो. हे मृत पेशी देखील काढून टाकते, जेणेकरून काही दिवसात आपल्या कपाळावरील सुरकुत्या दूर होतात.तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा जेव्हा आपले शरीर हायड्रेट असते तेव्हाच चेहऱ्यावर चमक येते. म्हणूनच, तुमच्या कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, शरीराला नेहमीच हायड्रेट ठेवा आणि त्यासाठी दररोज किमान ८-१० ग्लास शिस्तबद्ध पद्धतीने पाणी प्या. पाणी आपल्या शरीरास डिटॉक्स करण्याचे देखील कार्य करते

नित्यनियमाने योग करा आपल्या चेहऱ्यावरील हावभाव हे देखील सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण असू शकते. तर यापासून मुक्त होण्यासाठी आपल्या दिनचर्येमध्ये फेस योगाचा समावेश करा. यामुळे केवळ नकारात्मक प्रभाव कमी करण्यातच आपण सक्षम होऊ शकत नाही तर चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखून आपला चेहरा तरूण ठेवू शकता.सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहेसूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट (UV) किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात, म्हणून आपली त्वचा सूर्याच्या हानीकारक किरणांपासून सुरक्षित ठेवा आणि जेव्हा

आपण बाहेर जाल तेव्हा तज्ञांचा सल्ला घेऊन सनस्क्रीनचा वापर करा. आपण दररोज याचा वापर केल्यास ते आपल्या सुरकुत्या कमी करते. त्याचबरोबर आपले सौंदर्य देखील अबाधित राहते. Lumirose Sunscreen lotion 50 SPF चे सर्वात उत्तम.संतुलित आहार घ्यासुरकुत्यापासून मुक्त होण्यासाठी पौष्टिक घटकांसह संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या दिनचर्येमध्ये आहारात ताज्या फळांचा रस, हिरव्या भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य इ. चा सामावेश करा. हे त्वचेचे मृत पेशी काढून टाकते त्याचबरोबर नवीन पेशी तयार करण्यासाठी त्वचेला अँटी-ऑक्सिडेंट देखील पुरवते.

English Summary: Great remedy for reducing wrinkles on the forehead
Published on: 23 May 2022, 02:47 IST