सध्या नवीन वर्षाची सुरुवात झाल्यापासून कोरोनाधडकी भरवेलअशा संख्येने वाढत आहे. यावरच खबरदारी म्हणून कोरोना विरुद्ध लसीचा तिसरा डोस साठीची नोंदणी आज संध्याकाळी पासून सुरू होत आहे. येत्या 10 जानेवारीपासून दिल्या जाणाऱ्या या लसी करिता ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग अशा दोन व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
या तिसऱ्या लसीचा डोस साठी फ्रन्टलाइन वर्कर्स, गंभीर आजार असलेले लोक, आरोग्य कर्मचारी तसेच 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाची ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश प्राधान्य म्हणून करण्यात आला आहे.
याबाबतीत केंद्राची गाईडलाईन्स
हा तिसरा डोस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवडे उलटणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या तिसऱ्या डॉ साठी पात्र होईल तेव्हा त्याला एक संदेश पाठवला जाईल. हा पाठवण्यात येणारा संदेश कोविन ॲपच्या माध्यमातून येणार आहे.
त्यानंतरच तिसरा डोस देता येणार आहे. विशेष म्हणजे हा डोस साठ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहे.तसेच एकापेक्षा अधिक आजारांनी ग्रस्त असलेल्यांनाच दिला जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकारने कोमोर्बीडिटीआजारांमध्ये 22 आजारांना समाविष्ट केले आहे. अशा आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिसऱ्या डोससाठी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज पडणार नाही.
तरीही अशा आजारांनी ग्रस्त लोकांनी तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तसेच या डोससाठी कोविनवर स्लॉट बुक करणे बंधनकारक नाही. मात्र हा डोस कुठल्या लसीकरण केंद्रावर दिले जात आहे याची माहिती केवळ या ॲप वर मिळेल. हा डोस सरकारी लसीकरण केंद्रावर पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. पण खाजगी हॉस्पिटलमध्ये घेतल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
Published on: 08 January 2022, 02:19 IST