मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. शिवाय कोणत्या गोष्टी खाव्यात तसेच कोणत्या खाऊ नये असे एक ना अनेक पथ्थे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना पाळावे लागतात. अंजीराचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांना फायद्याचे आहे. याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे रुग्णांना थोडा दिलासा मिळू शकेल शिवाय इतर आजारदेखील कायमचे दूर होतील.
मात्र रुग्णांनी अंजीर खाण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया अंजीर सेवन केल्यास आरोग्याला काय फायदे होतात.
अंजीरमध्ये या घटकांचा समावेश असतो -
मधुमेहाच्या रुग्णांसाठी अंजीर खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम तसेच अनेक पोषकतत्वे असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
आता मोठ्या दोन बँकांचे होणार खाजगीकरण? खातेधारकांना मोठा धक्का
मधुमेहरुग्णांसाठी अंजीर कसे काम करते -
अंजीरमध्ये अॅण्टी-डायबेटिक गुणधर्म असतात. त्यामुळे मधुमेहामुळे शरीरावर होणारे वाईट परिणाम कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. तसेच यामध्ये विरघळणारे फायबर आढळते, जे रक्तात ग्लुकोज लवकर शोषू देत नाही.
मधुमेहाच्या रुग्णांनी असे करावे अंजीराचे सेवन -
मधुमेही रूग्ण सुके अंजीर दुधात मिसळून पिऊ शकतात. यासाठी खूप सोपी पद्धत आहे, सुके अंजीर दुधात ४-५ तास भिजत ठेवावे. आणि नंतर रात्री झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करावे. असं असलं तरी, अंजीराचे सेवन मर्यादित प्रमाणातच करण्याचा सल्ला दिला जातो.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांनो डाळीतले किडे काढण्याची सोपी ट्रिक वापरा, एका मिनिटात होईल काम
धक्कादायक...! तुम्ही पिताय तो चहा आहे भेसळयुक्त? पोलिसांनी केला भेसळयुक्त माल जप्त
Published on: 18 May 2022, 05:48 IST