Health

शेळी पालन व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो. शेळीपालनामध्ये बरेजण शेळीच्या दुधाला हवे तेवढे महत्त्व देत नाहीत. परंतु शेळीचे दूध हे आरोग्यदायी आणि पचायला हलके असते.

Updated on 18 November, 2021 8:24 PM IST

शेळी पालन व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो. शेळीपालनामध्ये बरेजण शेळीच्या दुधाला हवे तेवढे महत्त्व देत नाहीत. परंतु शेळीचे दूध हे आरोग्यदायी आणि पचायला हलके असते.

जर शेळीच्या दुधाचा आहार मूल्याच्या दृष्टीने विचार केला तर ते औषधी समजले जाते. एक परिपूर्ण सकस आहार म्हणून  शेळीचे दूध महत्त्वाचे आहे. या लेखात आपण शेळीच्या दुधाचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

 हे आहेत शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे

  • शेळीचे दूध पचनास हलके असण्याचे कारण म्हणजे शेळीच्या दुधामध्ये असलेल्या स्निग्ध पदार्थांच्या कणांचा आकार सूक्ष्म असतो.
  • शेळीच्या दुधामध्ये शरीराला हानिकारक असलेल्या सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे घटक जास्त असतात.
  • शेळीच्या दुधामध्ये नऊ ते दहा प्रकारची खनिजे असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक खनिजांची असलेली कमतरता कमी होण्यास मदत होते.
  • दररोज एक ग्लास शेळीचे दूध प्यायले तर आतड्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
  • जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, अशावेळी जर शेळीचे दूध प्यायले तर त्या चमचे कमतरता भरून निघण्यास मदत होते व हाडे मजबूत होतात.
  • शेळीच्या दुधात सेलेनियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमतावाढण्यास मदत होते.
  • लहान मुलांना शेळीचे दूध प्यायला द्यावे कारण यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने शरीराचा विकास चांगला होतो.
  • शेळीचे दूध प्यायल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते व हार्ट अटॅक तसेच स्ट्रोक्स या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.हृदयाचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी देखील हे दूध फायदेशीर आहे.
  • शेळीच्या दुधात पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • शेळीच्या दुधामध्ये आद्रता 85 ते 87 टक्के, प्रथिनांचे प्रमाण हे तीन ते साडेतीन टक्के व स्निग्धता साडेचार टक्के, शंकरा चार ते पाच टक्के आणि खनिज पदार्थ 0.5 ते एक टक्का असते.
English Summary: goat milk is useful for good health drink goat milk keep good health
Published on: 18 November 2021, 08:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)