Health

तुप हे अनेक प्रकारे मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे. परंतु आपण जे तूप खातो ते नेमके तयार करण्याची पद्धत आणि प्रकारहे देखील तितकेच महत्वाचे असते.

Updated on 27 May, 2022 9:35 PM IST

तुप हे अनेक प्रकारे मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे. परंतु आपण जे तूप खातो ते नेमके तयार करण्याची पद्धत आणि प्रकारहे देखील तितकेच महत्वाचे असते.

परंतु तुपाची योग्यता आपल्याला माहित असणे देखील तितकेच गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण घरगुती पद्धतीने कढवलेल्या व A2 प्रकारच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाचे फायदे जाणून घेणार आहोत.

 तुपाचे आरोग्यदायी फायदे

1- वजन वाढले की अनेक जण तूप खाणे बंद करतात पण हा गैरसमज आहे. गाईच्या तुपाचे सेवन केल्यासशरीराला अनेक फायदे होतात.त्वचा, डोळे, हाड यासह शरीराच्या अनेक भागांसाठी गाईचे तूप लाभदायी आहे.

2-गाईचे दूध,तूप,दही,गोमूत्र आणि शेणयांना सामूहिक स्वरूपात पंचगव्य असे म्हटले जाते.आयुर्वेदामध्ये याला औषधी मान्यता आहे. पंचगव्या चा उपयोग करून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांना मुळापासून नष्ट केले जाऊ शकते.  गाईच्या तुपाला अमृत म्हटले जाते या तारुण्याला कायम ठेवून वृद्धपणा दूर ठेवते.

3-गायीचे शुद्ध तूपाने मानसिक,शारीरिक,बौद्धिक विकास होतो. शुद्ध तुपाच्या नियमित सेवनाने बळ,  वीर्य आयुष्य वाढते आणि पित्त शांत होते. अशा पद्धतीने स्त्री-पुरुष संबंधातील सर्व समस्या दूर होतात.

4- जुन्या काळात युद्ध- लढाईमध्ये झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे.  तूप जेवढे जुने तेवढे जास्त गुणकारी असते.

5-घृत, अज्या, हवी, सर्पि, घी असे अनेक विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर,अत्यंत बलवान,थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्र धातूंचे पोषण करणारे आहे.

6--तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.

7- तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.

8- तूप कोणत्याही रोगात विशेषत वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधी द्रव्य तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.

9- डोळे दुखत असतील तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेतकिंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.शंभर वेळा धुतलेले तूप( शतधौत घृत)त्वचाविकार,जखमा,अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.

10-तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते.तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते. रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायला तर सकाळी शौचाला साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.

11- तूप खाल्ल्या बरोबर रूप लगेच येत नसले तरी तूप आल्यावर लगेच चरबी वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात,फिरतात आणि व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.

12- कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषधहोय.तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे.

13- हे तूप अतिशय गुणकारी असून लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना खूप फायदेशीर आहे.

सौ. कविता हेमंत वाणी ( कृषिकन्या)

रघुवंश फार्म,चोपडा

 ग्राहक सेवा नंबर

07721892168

09881580208

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकर्यांना पुन्हा एकदा झटका! पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा अनुदान बंद, जिल्हा बँकांनाही फटका

नक्की वाचा:शेतकऱ्यांनीच मार्केट हातामध्ये घेतले तर…! कवडीमोल दराने विकल्या जाणारा कांदा शेतकऱ्यांच्या एकजुटीने पोचला व्हीएतनामला

नक्की वाचा:SBI Loan: तर तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर मिळू शकते तुम्हालाही 35 लाख रुपयांपर्यंतचे लोन, वाचा अटी

English Summary: ghee is so benificial and give more healthy benifit to body
Published on: 27 May 2022, 09:35 IST