Health

शेवगा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेवगा बर्याच जणांचा आवडता अन्नपदार्थ असून शेवग्याच्या नियमित सेवनाने माणूस तंदुरुस्त आणि तरुण राहतो. विविध रोगांवर उपचार करण्यासाठी शेवग्याचा वापर केला जातो. यामध्ये अँटी फंगल, अँटी व्हायरस आणि अँटी इनफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. शेवग्याच्या फुले, पानांचा देखील खूप मोठा फायदा आरोग्यासाठी होतो. या लेखामध्ये आपण शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे काय होतात? त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.

Updated on 30 September, 2022 1:22 PM IST

शेवगा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेवगा बर्‍याच जणांचा आवडता अन्नपदार्थ असून शेवग्याच्या नियमित सेवनाने माणूस तंदुरुस्त आणि तरुण राहतो. विविध रोगांवर उपचार करण्यासाठी शेवग्याचा वापर केला जातो.  यामध्ये अँटी फंगल, अँटी व्हायरस आणि अँटी इनफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. शेवग्याच्या फुले, पानांचा देखील खूप मोठा फायदा आरोग्यासाठी होतो. या लेखामध्ये आपण शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे काय होतात? त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.

नक्की वाचा:तुळशीच्या पानात आहेत एवढे आरोग्यदायी गुणधर्म, वाचून थक्क व्हाल

 शेवग्याच्या पानांचे आरोग्याला होणारे फायदे

1- शेवग्याच्या पानांमध्ये फोलिक आणि अस्कॉर्बिक अॅसिड आणि फेनोलिक आढळते. एवढेच नाही तर 40 पेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट यामध्ये असतात.

शेवग्याच्या पानाच्या अर्कामध्ये असलेले अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म इन्सुलिन लेव्हल कमी करण्यासाठी मदत करतात व इन्शुलिनची पातळी संतुलित ठेवतात. याचा फायदा हा प्रमुख्याने डायबिटीज असलेल्या रुग्णांना होतो.

2- तसेच शेवग्याच्या पानांमुळे हृदयाला घातक असलेले वाईट कोलेस्टेरॉलच्या वाईट परिणाम यापासून संरक्षण मिळते. शेवग्याच्या पानांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते व पानांमध्ये असलेल्या पोटॅशियमचा फायदा हा रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

नक्की वाचा:Health Tips: तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी 'या' फळांचे सेवन ठरेल खूप फायदेशीर, वाचा माहिती

3- कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी देखील शेवग्याच्या पानांचा उपयोग होतो. यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट मुळे कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

4- या पानांच्या रसामध्ये सिलीमरिन नावाचे घटक असतात. या घटकांमुळे लिव्हरचे एंजाइमचे कार्य वाढते. 100 ग्राम शेवग्याच्या पानांच्या पावडर मध्ये जवळजवळ 28 मिलिग्रॅम लोह असते.

यामुळे शरीराला आलेला अशक्तपणा दूर होतो. तसेच शेवग्याच्या पानांमध्ये असलेले जस्त, लोह तसेच ओमेगा-3 फॅटी ऍसिडमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते व ओमेगा 3 स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

(टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषीजागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही उपचार करण्या अगोदर किंवा आहारात बदल करणे अगोदर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

नक्की वाचा:Health Update: मुळव्याध आहे तर 'या' पदार्थांचे सेवन केल्याने पडू शकतो आराम, वाचा या बद्दल डिटेल

English Summary: get so many health benifit to drumstick leaf and most advantage to heart
Published on: 30 September 2022, 01:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)