Health

'जो खाईल तूप त्याला येईल रुप' असं घरातील वडीलधारी मंडळी नेहमीच म्हणत असतात. मात्र ज्यादा तूप खाल्ल्यास शरीरातील चरी वाढून वजन वाढेल, लठ्ठपणा येईल आणि शरीराचा बांधा बिघडेल, अशी अनामिक भीती असते. तुमच्या मनात असा काही गैरसमज असेल तर तो काढून टाका.

Updated on 28 January, 2022 11:13 AM IST

जो खाईल तूप त्याला येईल रुप' असं घरातील वडीलधारी मंडळी नेहमीच म्हणत असतात. मात्र ज्यादा तूप खाल्ल्यास शरीरातील चरी वाढून वजन वाढेल, लठ्ठपणा येईल आणि शरीराचा बांधा बिघडेल, अशी अनामिक भीती असते. तुमच्या मनात असा काही गैरसमज असेल तर तो काढून टाका.

जेवनात तुपाचा समावेश असायालच हवा. वडिलधाऱ्यांचा सल्ला अनाठायी नव्हता. त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. मात्र या कारणाचा आपण कधी शोध घेण्याचाही प्रयत्न केला नाही. फिटनेसबाबत आणि जागृक असणारे लोक गावरान तुपाचा वापर आहारात करीत नाही. मात्र गावरान, तूप, खाल्ल्याने वजन किंवा चरबी वढत नाही.

उलट गावरा तुप खाल्ल्यास शरीराला फायदेच अधिक होतात. आयुर्वेदामध्येही गावरान तुपाला एक औषध म्हणून अनन्य साधरण महत्त्व आहे. मात्र वजन वाढण्याच्या भीतीने गावरान तुपाऐवजी आहारात रिफाईड तेल वापरतात. मात्र ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गावरान तुपामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला मजबुती येते आरोग्यासाठी गावरान तुपाचे काय फायदे होतात. याबाबत सविस्तर जाणून घेऊ..

गावरान तूप खाण्याचे फायदे

कोलेस्ट्रॉल वाढीसाठी उपयुक्त

कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्या लोकांन गावरान तुपापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आपल्या शरीरात दोन प्रकराचे कोलेस्ट्रॉल असतात. एक चांगले आणि एक वाईट कोलेस्ट्रॉल तुपात चांगले कोलेस्टॉल असते. जे शरीराला आतून मजबूत व सुदृढ बनविते.

 

पचनशक्ती सुधारते

देशी तुपामध्ये फॅटची मात्र फारय कमी असते. शिवाय तुपामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते ज्यांना बुद्धकोष्टतेचा त्रास आहे. अशा लोकांना आहारात देशी तुपाचा समावेश केला तर पोट वेळेवर साफ होते.

चेहऱ्यावर ग्लो येतो

गावरान तुपाच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गावरान तूप लावून झाल्यास उजळण्यास तत्वे असतात. त्याचा शरीराला मोठा फायदा होतो. तुपात भरपूर मॅटी ऑक्सीडेट गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील विषारी घटक निघून जातात. तसेच चेहऱ्यावरील मृतपेशी असतील तर नियमितपणे तूपाचे सेवन केल्याने मृतपेशी निघून जातात. त्याचा नैसर्गिकरीत्या चमकते चेहऱ्यावरील काळ डाग, पिंपल्सची समस्या दूर होतात. शरीराला व्हिटॉमिन्स ए ची कमतरता भरुन निघते.

 

तुपाचे प्रमाण

कोणतेही गोष्ट मर्यादा पेक्षा जास्त केली तर ती आपल्यासाठी विपरीत ठरु शकते. तसेच तुपाचे आहे, त्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त तुपाचे सोबत केले त्याचा विपरीत परीणाम शरीरावर होऊ शकतो या बाबत वा अन्य आजार असणाऱ्या व्यक्तींनी आहार तज्ज्ञ व डॉक्टरंचा सल्ला घेऊनच आहारात तुपाचा समावेश करावा.

English Summary: Get rid of the fear of weight gain, eat ghee and get innumerable physical benefits
Published on: 28 January 2022, 11:13 IST