Health

सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये केव्हा आणि कोणत्या वेळी आरोग्याच्या समस्या उद्भवतील हे सांगताच येत नाही. अचानक आलेल्या बऱ्याच प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीस्मुळे अचानक खूप जास्त पैशांची गरज पडू शकते.

Updated on 28 February, 2022 1:44 PM IST

सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये केव्हा आणि कोणत्या वेळी आरोग्याच्या समस्या उद्भवतील हे सांगताच येत नाही. अचानक आलेल्या बऱ्याच प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीस्मुळे अचानक खूप जास्त पैशांची गरज पडू शकते.

अशावेळी बऱ्याच कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली जाते. याचे अत्यंत हे कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच जणांना आले.कारण अशा वैद्यकीय एमर्जन्सी येण्याचा कुठल्याही प्रकारची वेळ हि नसते.अशा संकट काळी आपल्या जवळ पैसे असणे खूप आवश्यक असते.या लेखामध्ये आपण सरकारच्या अशा एका योजने बद्दल माहिती घेणार आहोत की याद्वारे आपण फक्त एका तासात एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकतो.

  काय आहे नेमके सरकारची योजना?

 ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या योजनेअंतर्गत जे लोक नोकरी करतात अशा कर्मचाऱ्यांना आपत्कालीन गरजेसाठी एका तासात एक लाख रुपये मिळण्याची सुविधा आहे.

याबाबत सर्क्युलर हे शासनाने एक जून 2021 रोजी जारी केले असून या सुविधेचा वापर करून कर्मचारी जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.अगोदर या प्रक्रियेसाठी तीन ते सात दिवसांचा कालावधी जात होता परंतु कोरोना कालावधीनंतर यामध्ये बदल करण्यात आला असून एका तासाच्या आत रक्कम जमा करण्याचा नियम बनवण्यात आला आहे.  ही सुविधा सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी असून याचा लाभ घेण्यासाठी पेशंटला सरकारी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.

 पैसे मिळण्याची प्रक्रिया   

  • अगोदरepfindia.gov.inया संकेतस्थळावर जावे.त्यानंतर वरती ऑनलाईन ऍडव्हान्स क्लेम वर क्लिक करावे.https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterfaceया लिंकवर तुम्ही जाल.
  • त्यानंतर ऑनलाईन सेवा वर जा आणि त्यानंतर क्लेम( फॉर्म-31,19, 10c आणि 10डी)भरावा लागेल.बँक खात्याची अखेरचे चार अंक पोस्ट करावी.
  • त्यानंतर खाते व्हेरिफाय करावे. हे झाल्यानंतर प्रोसीड फोर ऑनलाईन क्लेम वर क्लिक करा  व ड्रॉप-डाऊन मधून पीएफ अडव्हांस हा पर्याय निवडा.
  • यामध्ये हवी ती रक्कम टाका.चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा व पत्ता टाका.
  • गेट आधार ओटीपी वर क्लिक करा व आधार लिंक मोबाईल वर आलेला ओटीपी नोंदवा.
  • तुमचा क्लेम फाईल झाल्यानंतर त्याला दुजोरा मिळाल्यानंतर एक तासाभराच्या आत मध्ये खात्यात पैसे जमा होतील.
  • सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फार मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.
English Summary: get one lakh in one hour by epfo holders that is goverment scheme for goverment staff
Published on: 28 February 2022, 01:44 IST