Health

अतिरिक्त वजन ही आता बऱ्याच जणांचे समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बरेच लोकं व्यायाम करण्याला प्राधान्य देतात. त्यासोबतच आहारात काय खावे आणि काय खाऊ नये, जे वजन कमी करण्यासाठी मदत करेल.

Updated on 30 January, 2022 6:39 PM IST

अतिरिक्त वजन ही आता बऱ्याच जणांचे समस्या होऊन बसली आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी बरेच लोकं व्यायाम करण्याला प्राधान्य देतात. त्यासोबतच आहारात काय खावे आणि काय खाऊ नये, जे वजन कमी करण्यासाठी मदत करेल.

यासाठी प्रत्येक जण चिंताग्रस्त असतो. व्यायाम केल्यानंतर जर आपण असे काही खाल्ले तर वजन कमी होणार नाही. त्यामुळे आपण केलेल्या सगळ्या प्रकारच्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकते. बरेच आहारतज्ञ फळे आणि भाज्या खाण्याची शिफारस करतात. त्यामुळे या लेखात आपण जाणून घेऊ की वजन कमी करण्यासाठी कोणती फळे किंवा भाज्या अधिक फायदेशीर आहेत. जर आपल्याला पोटातील चरबी कमी करायची असेल तर त्यासाठी ब्रोकोली किंवा स्प्राऊट्स यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्यांचा समावेश आहारात करू शकता. त्यासोबतच स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि नाशपाती सारखे फळे देखील चांगले मानले जातात. परंतु वजन कमी करण्यासाठी फळे खूप प्रभावी असतात.

  • स्मूदी वजन कमी करते-स्मुदीच्या सेवनाने वजन कमी करण्यात खूप मदत करते.स्मूदिमध्ये अनेक प्रकारचे फळे असतात ज्यामध्ये फायबर असते. याशिवाय जर आपण दररोज नाशपाती आणि सफरचंद इत्यादी फळांचे सेवन केले तर वजन कमी होऊ शकते. च्या लोकांना भाज्या खाण्यालाआवडतात ते वजन कमी करण्यासाठी फुलकोबी,पालक, सोया आणि सोया पनीर यांचा आहारात समावेश करू शकता कारण यामध्ये भरपूर फायबर आढळते.
  • फळे चांगल्या की भाज्या- फळे आणि भाज्यांवर केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की,वजन कमी करण्यासाठी भाज्यांपेक्षा फळे चांगली असतात. कारण फळे हे पचण्यास हलकी असतात त्यांना पचायला वेळ लागत नाही. परंतु भाजीपाला पचायला बराच वेळ लागतो. फळांमध्ये बरेच एंटीऑक्सीडेंट घटक असतात. तसेच ते शरीरात उच्च प्रमाणात ऊर्जा प्रदान देखील करतात. फळांचे सेवन केल्याने भूक कमी लागते तसेच दिवसभर दररोज थोडेथोडे खाण्याची इच्छा राहत नाही. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन करणे कधीही चांगली असते.
  • पावसात भाज्या खाणे हानिकारक- पावसाळ्यात संक्रमणाचा धोका जास्त असल्यामुळे भाज्यांचे सेवन करणे हानिकारक असू शकते. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. जर ते शिजवलेले आणि नीट खाल्ले नाही तर पोटात गॅस, अपचन आणि बद्धकोष्टता सारख्या समस्या निर्माण होतात. परंतु पावसाळ्यात जर फळे खाल्ली तर ती आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

( टीप- वरील माहिती ही विविध स्रोतांपासून घेतली असून ती वाचकांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे.त्या माहितीशी कृषी जागरण आणि टीम व व्यक्तिगत रित्या सहमत असू असे नाही.)

English Summary: friut or vegetable what is useful for weight loss know that charactristic
Published on: 30 January 2022, 06:39 IST