Health

अनेक ज्येष्ठांना अपचनाचा त्रास सतावत असतो. अशावेळी त्यांनी आपल्या आहारात काय समावेश करायला हवे हे जाणून घेऊया.

Updated on 09 May, 2022 11:37 AM IST

चेरी, द्राक्ष, बदाम अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. दररोज दुपारी एक वाटी दही प्या. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. ते पचनव्यवस्था सुधारतात. ज्या लोकांना मांसाहार जास्त आवडतो अशा लोकांनी कमी चरबी असलेले मांस खायला हवे.

कारण मांस पचायला वेळ लागतो. आलं, काळे मिरे, सैंधव मीठ आणि धणे या मसाल्यांचा जेवणात समावेश असायला हवा. हे मसाले जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर पचनकार्य सुधारतात. व्हिटॅमिन-सी असलेले ब्रोकोली, टोमॅटो, किवी फळ, स्ट्रॉबेरी हे खावेत. रंगीत फळं,भाज्या भरपूर साऱ्या खाव्यात त्याने पोट साफ होते आणि अपचनाचा त्रास होत नाही. 

सकाळी उठल्यावर व्यायाम आणि पोटाला मालीश केल्यास पचनशक्ती वाढते. काही चांगल्या तेलांनी पोटाची मालीश करावी. सकाळी गरम पाणी प्यायला आवडत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावा, पोटातले ऑसिड कमी होऊन पोट साफ राहील. भूकेपेक्षा थोडे कमी खावे, त्यामुळे पचन व्यवस्थितपणे व्हायला मदतच होईल. तुम्ही कोणत्या प्रकारे खाता, कशा प्रकारे खाता यावरही पचन कार्य अवलंबून असते. 

जेवायला मांडी घालून म्हणजे सुखासनात (भारतीय बैठक) बसावे. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे, प्रत्येक घासाचा ज्युस बनवून प्यायला पाहिजे. शांतपणे, समाधानाने, जेवणाचा आनंद घेत जेवले पाहिजे. त्यासाठी एखादा श्लोक म्हणून घरातील सर्व सदस्य एकत्र मिळून जेवायला बसायला हवे. जेवताना टीव्ही पाहू नये.

 

प्रमोद जाधव,

सुनील इनामदार.

English Summary: For proper digestion
Published on: 09 May 2022, 11:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)