Health

दूध मधुर, स्निग्ध, वायू व पित्तहारक, सारक, वीर्य उत्पन्न करणारे, शीतल, सर्वांना अनुकूल असणारे,

Updated on 09 July, 2022 5:32 PM IST

दूध मधुर, स्निग्ध, वायू व पित्तहारक, सारक, वीर्य उत्पन्न करणारे, शीतल, सर्वांना अनुकूल असणारे, जीवन देणारे, पौष्टिक, बलकारक, बुद्धिवर्धक, मैथुनशक्तिवर्धक, तारुण्य टिकवणारे, आयुष्यवर्धक अस्थिभंग सांधण्यास मदतरूप होणारे असे हे रसायन आहे. दूध रेचक्रिया, वमनक्रिया व नस्तिक्रियेप्रमाणे सामर्थ्य वाढवणारे आहे. ते जीर्णज्वर, मानसिक रोग, शोष, मुर्छा, भ्रम, ग्रहणीरोग, पांडुरोग, दाह, तहान, हृदयरोग, शूळ, उदावर्त, गोळा उठणे, बस्ती, अर्श, रक्तपित्त, अतिसार, योनीरोग, श्रम, ग्लानी, गर्भस्राव, इ. रोगांमध्ये दूध गुणकारी आहे.दूध सर्वांसाठी दैनंदिन आहार म्हणून देखील उपयुक्त आहे. गाईचे दूध रसात अगर पाकात मधुर, शीतल, अंगावरील दूध वाढविणारे, स्निग्ध, वात, पित्त व रक्तविकार दूर करणारे विविध दोष, धातू व नाडी समुहास आर्द्र ठेवणारे व जड आहे. या दुधाने जरावस्था नाहीशी होते व सगळे रोग बरे होतात. अन्न सेवन करणाऱ्यांना गाईचे दूध जड, कफकारक, बल

व मैथुनशक्तिवर्धक व निरोगी मनुष्याला गुणकारी आहे. काहींच्या मते गाईचे दूध वात प्रकृतीसाठी बाधक असते; परंतु ते चुकीचे आहे. उलट गाईच्या दुधाच्या सेवनाने वायू फार होत नाही, तसेच ते रेचक आहे व मलावरोध दूर करणारे आहे.गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध कमी प्रतीचे आहे. म्हशीचे दूध कफ निर्माण करणारे आहे. गाईच्या दुधातील प्रोटीन व कॅसिन जठरात लवकर पचले जाते. म्हशीच्या दुधातील कॅसिन पचण्यास अधिक श्रम पडतात. म्हशीच्या दुधात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते पचण्यास जड असते. त्यामुळे शरीरातील अनेक उपयुक्त क्षार हाडातून बाजूला होऊन ते दूध पचण्यास मदत करण्याच्या कामाला लागतात. यामुळे हाडांचा मजबूतपणा प्रमाणात कमी होतो.चरक यांच्या मते, गाईचे दूध स्वादिष्ट, शीतल, मृदू, स्निग्ध, जड, मंद व मनाला प्रसन्नता देणारे आहे. सुश्रुतांच्या मते, गाईचे दूध स्निग्ध, जड, रसायन,

रक्तपित्तनाशक, शीतल, मधुर, जीवन देणारे व वात व पित्तनाशक असते. म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा मधुर, स्निग्ध, वीर्यवर्धक, जड, झोप आणणारे, अभिष्यंदी (रसवाही नाड्यांना रोखणारे), भूक वाढविणारे व थंड आहे. म्हशीच्या दुधात साईचे प्रमाण अधिक असते. परंतु वैद्यकीय दृष्ट्या जे गुण गाईच्या दुधात आहेत ते म्हशीच्या दुधात नाहीत.सुश्रुतांच्या मते, म्हशीचे दूध स्रोत वगैरेमध्ये मंद व आर्द्रता निर्माण करणारे आहे. ते मधुर, झोप आणणारे, जठराग्नी मंद करणारे व गाईच्या दुधापेक्षा घट्ट व पचण्यास जड असते. बकरीचे दूध तुरट, मधुर, शीतल, मळ रोखणारे व हलके असते. ते रक्तपित्त, अतिसार, क्षय, खोकला व ताप दूर करणार आहे. बकऱ्यांची शरीरयष्टी लहान असते, त्या तिखट व कडवट पदार्थ खातात, पाणी कमी पितात व परिश्रम फार करतात. यामुळे त्यांचे दूध सर्व रोगांमध्ये गुणकारी असते. निरोगी बकरीचे दूध अधिक निरोगी व निर्दोष असते. गाईच्या दुधापेक्षा बकरीचे दूध पचायला हलके असते. त्यामुळे लहान मुलांसाठी ते अत्यंत आरोग्यदायी आहे.

सुश्रुतांच्या मते, बकरीचे दूध क्षय झालेल्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. ते अग्नी प्रदीप्त करणारे आहे व सर्व रोग दूर करणारे आहे. मेंढीचे दूध खारट, मधुर, स्निग्ध, गरम, मुतखड्यावर गुणकारी, हृदयास अप्रिय, तृप्तिदायक, वृष्य, वीर्यवर्धक, पित्त व कफकारक आहे. परंतु पोटातील गॅसवर (वायुवर) ते अत्यंत गुणकारी आहे. उंटीणीचे दूध हलके, मधुर, खारट, अग्नी प्रदीप्त करणारे तसेच कृमी, कोड, कफ, फेफरे, सूज व पोटातील रोग दूर करणारे व जुलाबात गुणकारी असते. मातेचे दूध हलके, शीतल, अग्नी प्रदीप्त करणारे तसेच वायू, पित्त, नेत्ररोग व शूळ दूर करणारे असते. ते नाकात व डोळ्यांत घालण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. गाईचे धारोष्ण दूध बलवर्धक, हलके, शीतल, अमृत समान, अग्नी प्रदीप्त करणारे करूनच ते व त्रिदोषनाशक असते. (गाईचे दूध काढल्यानंतर लगेच वापरावे.) जर ते थंड झाले असेल, तर गरम गाईचे धारोष्ण दूध, म्हशीचे काढल्यानंतर थंड झालेले दूध, मेंढीचे उकळलेले गरम दूध व बकरीचे गरम केल्यानंतर थंड झालेले दूध गुणकारी समजतात.

गाय व म्हशीच्या दुधाव्यतिरिक्त सर्व प्रकारचे कच्चे दूध पचायला जड, रवाही नाडीसमुहास रोखणारे कफ व आमवर्धक व अहितकारक आहे. आईचे दूध हितकारक असते. गरम दूध प्यायल्याने कफ व वायू दूर होतो, तर गरम करून गार केलेले दूध प्यायल्याने ते पित्त दूर करणारे असते. दुधात त्याच्या अर्ध्याने पाणी घालून ते पाण्याचा अंश असेपर्यंत उकळून प्यायले असता ते कच्च्या दुधापेक्षा पचण्यास अधिक हलके बनते. गाईचे किंवा बकरीचे दूध लहानशा रवीने घुसळून मग ते गरमगरमच प्यावे. ते पचायला हलके, मैथुनशक्तिवर्धक, ताप नाहीसा करणारे व वायू, पित्त व कफनाशक असते. गाय व बकरीच्या दुधाचा फेस त्रिदोषनाशक, रुची उत्पन्न करणारा, बलवर्धक, जठराग्नी प्रदीप्त करणारा, मैथुनशक्ती वाढवणारा, तृप्ती देणारा व हलका असतो. हा फेस अतिसारामध्ये, तसेच अग्निमांदय व जीर्णज्वरात खूपच फायदेशीर ठरतो.

 

वरील पोस्ट फक्त माहिती म्हणून आहे. पोस्ट वाचुन कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

English Summary: Extremely useful information about milk, milk is so beneficial
Published on: 09 July 2022, 05:32 IST