मित्रांनो आपल्या आहारात मिठाचा (Salt) समावेश असतोच. मिठा विना जवळपास कुठलीच भाजी बनवली जात नाही. मिठामुळे पदार्थाला चव येते याशिवाय मिठामध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराला फायदेशीर देखील आहेत. मीठाविना पदार्थ बनवला तर तो आळणी आणि बेचव लागेल. परंतु मिठाचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते. एवढेच नाही तर मिठाचे जास्तीच्या सेवनाने आपणास हार्टअटॅक देखील येऊ शकतो. म्हणून मिठाचे नियंत्रित सेवन करणे गरजेचे ठरते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मिठाचे नेमके सेवन किती करावे? याच प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया दररोज किती मीठ सेवन केले पाहिजे.
दररोज किती करावे मिठाचे सेवन
जास्त मीठ खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आजार लागू शकतात, मग आता प्रश्न असा आहे की नेमके दिवसभरात किती मीठ खाल्ले पाहिजे? मित्रांनो डब्ल्यूएचओच्या (World Health Organization) मते, एका स्वस्थ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त पाच ग्रॅम मिठाचे सेवन केले पाहिजे. जर आपण याच्या पेक्षा जास्त मिठाचे सेवन करत असाल तर आपण अनेक रोगांना आमंत्रण देणार एवढे निश्चित, मिठाचे जास्त सेवन केल्याने आपणास हाय ब्लड प्रेशर तसेच हार्टअटॅक सारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
मिठात असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर
मिठात सोडिअम (Sodium) आणि पोटॅशिअम (Potassium) हे दोन पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, मात्र असे असले तरी हे दोन्ही घटक जर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर यामुळे हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि हाय ब्लड प्रेशर मुळे आपणास स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मिठाचे नियंत्रित सेवन करणे गरजेचे असते. म्हणून डब्ल्यूएचओ च्या मते दिवसाला फक्त पाच ग्रॅम मीठ आपल्या शरीरासाठी पुरेसे आहे आणि यातून आपल्या शरीराला आवश्यक असलेले सोडिअम आणि पोटॅशिअम मिळून जाते.
खरं काय! जास्तीचे मीठ सेवन केल्याने दरवर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू
डब्ल्यूएचओच्या एका स्टडी रिपोर्टनुसार, मिठाचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने दरवर्षी 30 लाख लोकांचे बळी जातात. जगात अनेक लोक एका दिवसाला 9 ते 12 ग्रॅम मिठाचे सेवन करतात. जे की आपल्या शरीराला खूपच अपायकारक (Dangerous) आहे. जर लोकांनी मिठाचे आवश्यकतेनुसार सेवन केले तर वर्षाकाठी 25 लाख लोकांचे जीव वाचतील.
Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Published on: 30 December 2021, 02:39 IST