Health

मित्रहो आपण सर्वजण खाण्यासाठी जगतो.आहार वाढीसाठी व जगण्यासाठी फार महत्वाचे असतात.

Updated on 14 April, 2022 5:21 PM IST

मित्रहो आपण सर्वजण खाण्यासाठी जगतो.आहार वाढीसाठी व जगण्यासाठी फार महत्वाचे असतात.आपण काय खातोय हे जसे आरोग्यासाठी महत्वाचे असते तितकेच महत्वाचे आहे आपण ते कसे खातो.आता इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, कि जे अन्न आपण खातोय ते आपल्याला व्यवस्थित पचेल का ?. खरच गहन प्रश्न आहे हा.विद्यार्थी जीवन म्हटले कि नेहमीचीच घाई गडबड.नेहमीच उठायला उशीर, चुकून कधी लवकर उठलो तर टंगळमंगळ करत शेवटी उशीरच, मग गडबडीत दूध प्यायले न प्यायले करीत शाळेला पळायचे. सकासकाळीच बिचाऱ्या आईचा आक्रोश "अरे आवर उशीर होतोय, बस जाईल.पण याचा मुलांवर काहीही परिणाम होत नाही. नास्ता वैगरे करताना फटाफट चावले न चावले करत ताटात वाढलेले संपवायचे अथवा पुन्हा उशीर झाला म्हणून अर्धवट टाकून शाळेत पाळायचे.आता गम्मत बघा, अशा प्रकारे खाल्लेले अन्न पचत असेल का हो ? म्हणजे पोटात कोंबायचे आणि आणि पुढची कामे करत राहायची.पचन जर नीट झाले तर ते नीट अंगाला लागते,अन्यथा भूक न लागणे, अपचन होणे, चेहऱ्यावर फोड्या येणे,पोट साफ न होणे अशा अनेक समस्या उदभवतात.मजेचा भाग म्हणजे याच वयात आपण सुंदर दिसावे असे नुकतेच वाटायला लागलेले असते आणि चेहरा मात्र मुरमानी भरलेला असतो.शाळेचा, अभ्यासाचा, खाण्यापिण्याच्या, कपड्याच्या खर्चात फेसवाश, क्रीम्स यांची भर पडलेली असते.आता यांचा किती फायदा होतो ते लावणारेच जानोत. शरीर अगदीच कृश अथवा स्थूल होऊन जाते.

पचनाच्या संबंध पदार्थापेक्षा आपली खान्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो हेच मला तुम्हाला सांगायचे आहे.कारण कायम पचनाच्या समस्या आपल्या वाढीमध्ये बाधा निर्माण करू शकतात.यासाठी आपल्याला प्रथम आपली पचनसंस्था कशी काम करते हे थोडक्यात समजावून घ्यावे लागेल. तोंडापासून ते मोठ्या आतड्यापर्यंत हा प्रवास निरंतर सुरु राहतो.म्हणून सुरवात उत्तम तर शेवट चांगला.यासाठी जे जेवण आपल्या समोर आले आहे ते नीट चावून खाल्ले पाहिजे.

आपण अनेकदा पाहतो अनेक मुले घाई गडबडीत नास्ता अथवा दूध घेतात.मुलांचे सोडा, मोठी माणसेही अशीच गडबडीत असतात.बाकी सर्व व्यवस्थित करायचे मात्र जेवण उरकायचे ते लवकरात लवकर.जणू कोणाशी स्पर्धा लागली आहे.कित्येक जण तर स्वतः सांगतात सुद्धा " आपले जेवण फटाफट असते, जेवायला अर्धातास मिळतो,मी पाच ते दहा मिनिटात जेवण आटोपून मस्त पैकी एक डुलकी काढतो". खरच असे ऐकले कि वाईट वाटते.अहो ज्या पोटासाठी आठ ते बारा तास राबायचे ते भरण्यासाठी किमान वेळ तरी दिला पाहिजे.

काय होत असेल यांच्या पचनाचे ? तर हाच आजचा विषय आहे. आता पाहू पचनसंस्था कशा पद्धतीने काम करते.आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे कि घास तोंडात गेल्यावर चावून बारीक झाला कि गिळला जातो.मग जठरात इतर पाचक स्रावांबरोबर छान पैकी मिसळला जातो.तिथून पुढे अन्न लहान आतड्यात येते, येथे पुन्हा आवश्यक पाचक रस,पित्त,इन्सुलिन वैगरे मिळून ते पचायला लागते, पुढे पचलेले अन्न मोठया आतड्याकडे ढकलले जाते.तिथे काही मात्रेत पाणी शोषून घेऊन टाकाऊ भाग गुद्वाराच्या दिशेने ढकलला जातो.हे झाले थोडक्यात आणि सोप्या भाषेतले पचनाचे कार्य.आता पाहू पाचक रस कुठे असतात.अन्न कोणतेही असोत पाचक रसांशिवाय ते पचूच शकत नाही.हे पाचक रस सुद्धा विशिष्ट ठिकाणीच असतात.जसे कार्बोदकांना पचण्यासाठी आवश्यक असणारे टायलींन हे स्त्राव फक्त तोंडातच असतात.प्रथिनांच्या पचनासाठी लागणारे जठरात असतात, तर चरबी पचवणारे लहान आतड्यात.कर्बोदके म्हणजे आपली चपाती,भात, भाकरी, साखर, गुळ, रवा, मैदा,शिरा, उपमा ,पोहे, खीर रताळे,बटाटे, पालेभाज्या,सर्व फळे वैगरे.आपण जरी मांसाहारी असाल तरी आपण ते भाजीच्या अथवा राईसच्या रुपात खातो.

म्हणजे चपाती अथवा भाकरी आलीच, नाहीतर भात तर आहेच.थोडक्यात काय तर आपल्या आहारात नव्वद टक्के भाग शाकाहाराचाच असतो.आणि हे सर्व पदार्थ तोंडातल्या स्रावातच पचतात,पण नीट चावून खाल्ले तर.बराच वेळ अन्न चावत राहिल्याने मोठ्या प्रमाणात लाळ निर्माण होते आणि हि लाळ म्हणजेच कार्बोदकांना पचवणारे एन्झाईम.जर अन्न नीट चावले नाही,जास्त वेळ तोंडात राहिलेच नाही तर हे पाचक रस सुटत नाहीत.आणि अन्न पचनातात बाधा निर्माण होऊ लागते.चेहऱ्यावर लहान मोठ्या पुटकुळ्या यायला लागतात.पोटात वायू धरू लागतो.पोट नीट साफ होत नाही.मग दिवसभर मन प्रसन्न रहात नाही.चिडचीडे व्हायला होते.यावर औषधांचा विशेष परिणाम होत नाही.रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.याचा कळत नकळत परिणाम आपल्या उंचीवर होत असतो.या सगळ्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे अन्न चावून खाणे.मन लावून जेवणे, प्रत्येक घासाचा आनंद घेणे, चव देऊन खाल्याने चेहरा छान, सुंदर, प्रसन्न वाटतो.कुठलीही क्रीम, फेश वाश जी किमया करत नाही ते घडते फक्त अन्न चावून खाल्याने.आणि अशाप्रकारे खाल्याने पचन उत्तम होते, पचन नीट झाल्यामुळे वाढ छान होते.आणि त्याला धावण्याची, सायकलिंग अथवा स्विमिंगची साथ मिळाली व योगासनांची मदत घेतली की उंची,वाढ आणि पचन या तिन्हींची प्रगती उत्तम होते. करून तर पहा.

- दत्ता गायकवाड

9821234080

English Summary: Experts say that if you eat carefully, you will feel better, find out how
Published on: 14 April 2022, 05:15 IST